लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील जमाना ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग व दंतरोग चिकित्सा शिबिरात 740 लाभाथ्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ यातील 72 रूग्णांना जिल्हा रूग्णालयात 22 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आह़े शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ़ हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आल़े कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये. जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, जिल्हा परिषद सदस्य नितेश वसावे, डॉ़ राजेश वसावे, जमाना सरपंच सुनिता वसावे, राजमोई सरपंच जयमल पाडवी, मोलगी सरपंच मनोज तडवी, अशोक राऊत, दिनकर पाडवी, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष धनसिंग वसावे, सुनिल राहसे, भूषण पाडवी, माजी सरपंच सांगल्या वसावे, भरत पाडवी आदि मान्यवर उपस्थित होत़े खासदार डॉ़ हीना गावीत यांनी रूग्णांसोबत संवाद साधत आरोग्याचे प्रश्न जाणून घेतल़े या शिबिरात डॉ़ गणेश पवार, डॉ़राजेश वसावे, डॉ़ संजय गावीत, डॉ़ नरेश पाडवी, डॉ़ शंकर वळवी, डॉ़व्ही. जी. पाटील, डॉ़ जयसिंग पाडवी, डॉ़ वंदना सोनोने, डॉ़ संदीप वसावे यांनी रुग्ण लाभाथ्र्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला़यशस्वीतेसाठी जमाना ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांनी परिश्रम घेतल़े
जमाना ग्रामीण रूग्णालयात 740 रूग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:53 PM