शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

१० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:36 PM

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे समाजातील ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे समाजातील सर्वच घटक प्रभावीत झाले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्यामुळे जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.याबाबत जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी उमविच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा पालकांनी केली आहे. तशी मागणीदेखील केली आहे.गेल्या वर्षी पावसाळ्यात जुलैच्या अखेरीस सुरूवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील लांबल्या होत्या. लांबलेल्या पावसाने सलग हजेरी लावली होती. त्यानंतर थोडीसी उसंत मिळाल्यामुळे शेतकºयांनी जशी तशी पेरणी उरकवून घेतली होती. परंतु पुन्हा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरूवात केल्यामुळे सलग दोन-तीन महिन्यांपर्यंत जोरदार पडला. या दरम्यान महापुरामुळे शेतकºयांचे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून थोडे फार उत्पन्न हाती लागण्याची शक्यता असतांना आॅक्टोबरच्च्या शेवटी पुन्हा अवकाळीने शेतकºयावर घाला घातला. साहजिकच हाता तोंडाशी आलेला घासदेखील नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेला. परिणामी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांच्या हाती काहीच पडले नाही. अगदी उत्पादनावर केलेला रासायनिक खते, बी-बियाण्यांचा खर्चदेखील निघाला नाही. शेतकºयांचे पूर्णपणे आर्थिक दिवाळे निघाल्यामुळे शेतकरी अक्षरश: कर्जबाजारी झाला आहे. अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे खान्देशातील शेतकºयांबरोबरच समाजातील सर्वच घटक प्रभावी झाले आहे. पालकांची अशी खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्यक्षेत्रातील म्हणजे ५२ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या यानिर्णयाचा लाभ नंदुरबार, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा या सहा तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार साधारण १० हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.वास्तविक अतिवृष्टी व ओला दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला होता. विद्यापीठाने घेतलेल्या फी माफीच्या निर्णयामुळे पालकांना थोडीशी का होईना आर्थिक मदत मिळाली आहे. परंतु विद्यापीठाच्या निर्णयाची संबंधीत महाविद्यालय प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी आदिवासी पालकांनी केली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कासाठी अडवून फिरवा फिरव करू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्का बरोबरच कॅप शुल्क, पासिंग सर्टीफिकेट, गुणपत्रक, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, पर्यावरण, जनरल नॉलेज, प्रोजेक्ट, डेझरटेशन इ. प्रकारच्या उपक्रमाचे शुल्क सुद्धा माफ केली आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज स्विकारताना कुठलीही अट न घालता अर्ज स्विकारून तसे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविण्याची सूचना दिली आहे. तथापि रपीक्षा अर्ज विलंबाने सादर करणाºया विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार विलंब शुल्क आकारणी करण्याचे निर्णयात म्हटले आहे. तथापि विद्यापीठाने लेट फी बाबतही धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. कारण अतिदुर्गम आदिवासी भागातील पालक व विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी असतात. त्यामुळे परीक्षा अर्ज भरताना तो वेळेवर उपस्थित राहू शकणार नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.