लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगारासाठी दूर देशी असले तरी आपल्या गावाकडील निवडणुकीची उत्सुकता अनेक खान्देशी बांधवांना असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमधील सुरत, उधना, अंकलेश्वर, वापी या भागात रोजगार, नोकरीसाठी गेलेल्यांना विधानसभा निवडणुकीची मोठी उत्सुकता लागून आहे. मतदानासाठी देखील अनेक बांधव आपल्या गावी येणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्यासाठी प्रत्येकाचा प्रय} सुरू आहे. ही बाब लक्षात घेता रोजगारासाठी गेलेल्या मतदार कुटुंबांकडे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते संपर्क साधू लागले आहेत. शिवाय अशा कुटूंबं देखील या भागातील निवडणुकीसंदर्भातील माहिती घेतली जात आहे. खान्देशातील बहुसंख्य नागरिक सुरतमधील उधना व परिसर, अंकलेश्वर, वापी येथे स्थायीक झाले आहेत. या ठिकाणी मराठी लोकांची संख्या मोठी आहे. नोकरी, रोजगारानिमित्त गेलेल्या अशा लोकांची शेती, घरे व नातेवाईक खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांची नाळ खान्देशशी कायमची आहे. त्यातील अनेक जण अजूनही या तिन्ही जिल्ह्यातील मतदार आहेत. त्यामुळे खान्देशातील कुठल्याही घडामोडीकडे या लोकांचे लक्ष लागून राहते. यंदा विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे राहिले आहे. गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेल्या अनेकांचे नातेवाईक, मित्र परिवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अशा लोकांशी संबंध आलेला आहे.शिवाय गावशिवची निवडणूक असल्यामुळे उत्सुकताही लागून आहे. आपल्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा आहे, कोणाचा जोर आहे, कोण कोणत्या पक्षाकडून लढत आहे, नातेवाईक कोणाच्या मागे ठाम उभे आहेत याविषयी चर्चा रंगत आहेत. काही जण आपल्या गावी दाखलदेखील झाले आहेत. मतदार असलेल्या अशा लोकांना घेण्यासाठी उमेदवारांकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधून किंवा मोबाईलद्वारे एसएमएस करून प्रचार केला जात आहे. गुजरातप्रमाणेच मध्यप्रदेशातील महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या अनेक गावांमध्ये मराठी कुटुंब स्थायीक झाली आहेत. खेतिया व परिसरातील गावांमध्ये अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा गावांमध्येही खान्देशातील विधानसभा निवडणुकीबाबत उत्सुकता लागून आहे.
4विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील देखील अनेक पदाधिकारी नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी दाखल झाले आहेत. अशा पदाधिकारी व कार्यकत्र्याना विशिष्ट भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाईकांर्पयत पोहचणे आणि त्यांना मतदानासाठी आवाहन करण्याचे काम या पदाधिका:यांकडे सोपविण्यात आले आहेत. 4गेल्या आठ दिवसांपासून नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात अनेक नवीन पदाधिकारी सध्या प्रचारात दिसून येत आहे. त्यांना पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच प्रचारात सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुका देखील वर्षभरापूर्वीच झाल्या आहेत. त्यामुळे त्या भागात राज्यातील विशेषत: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी सहभागी झाले होते. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील या भागातील पदाधिकारी प्रचारात सक्रीय झाले आहेत.