नंदुरबार : विस्तारित ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत 1 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 547 गावांमध्ये विस्तारीत ग्रामस्वराज्य अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दिली़ याअंतर्गत 7 योजनांवर भर राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली़ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली़ यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, डॉ. कातीलाल टाटीया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होत़े यावेळी 547 गावात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हरघर योजना (सौभाग्य योजना), उन्नत ज्योती योजना, मिशन इंद्रधनुष, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांचे नियोजन आणि आढावा घेण्यात आला़ राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी, एलपीजी वितरक, गॅस कंपन्यांचे अधिकारी आदींनी या बैठकीत विविध योजनांची माहिती दिली़ 15 ऑगस्ट र्पयत राबवण्यात येणा:या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आल़े याअंतर्गत 11 जुलै पासून कोपर्ली, होळ तर्फे हवेली, खोंडामळी, रनाळे, शनिमांडळ, नांदर्खे, धानोरा, आष्टे, पातोंडा, कोठली खुर्द ता़ नंदुरबार, रायंगण, निजामपूर, चितवी, करंजी बुद्रुक, खांडबारा, हळदाणी, बिलमांजरे, उमराण, चिंचपाडा ता़ नवापूर, बोरद, धनपूर, आमलाड, अमोनी, बुधावल ता़ तळोदा तसेच शहादा 13, अक्कलकुवा 10 आणि धडगाव तालुक्यातील 8 गावांमध्ये योजनांतर्गत शिबिरे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली़
नंदुरबारातील 547 गावांमध्ये विस्तारीत ग्रामस्वराज्य अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:39 PM