लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वत्र कोरोना परिस्थितीमुळे नियमांचे पालन करीत मॉल आणि जीमला राज्य शासनातर्फे येत्या काळात मान्यता मिळणार आहे. याच धर्तीवर लवकरच बॅन्ड कलावंत आणि वादकांना वाद्य वाजविण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आश्वासन दिले.दिवाळी नंतरच्या हंगामात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांची बुकिंग करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करुन जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांना दिलासा मिळाला. शासनस्तरावर मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख गायिका दिप्ती शिवदे, जिल्हा प्रमुख सुनिल पवार उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यापासून राज्यात कोविड- १९ च्या महामारीमुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बॅन्ड व्यवसायिक कलावंत आणि कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या काळात नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या लग्नसराई हंगामात यंदातरी बॅन्ड व्यावसायिकांना वाद्य वाजविण्याची परवानगी मिळावी आणि राज्यशासनातर्फे बॅन्ड कलावंतांना आर्थिक मदत मिळावी. सहा महिन्याच्या कालावधीत अनेक रोजंदारी कामगार आणि कलावंताच्या दैनंदिन कामावर आर्थिक परिणाम झाला आहे. शासनाच्या नियमानुसार गेल्या सहा महिन्यात लग्न समारंभासह कुठलेही सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे बॅन्ड कलावंत आणि वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वादक कलावंतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गायिका दिप्ती शिवदे, महाराष्ट्र बॅन्ड कलावंत संघटना जिल्हा अध्यक्ष सुनिल पवार, नंदुरबार तालुकाध्यक्ष सागर सोनवणे, अक्कलकुवा तालुका प्रमुख विनेश पाडवी, परवेज मकरानी, लक्ष्मण वसावे,प्रकाश वसावे, दिपक सोनवणे, एकनाथ गोरवे, पंडित पवार, रमेश मोरे, किशोर पाडवी, दिनेश पाडवी आदींच्या स्वाक्षºया आहेत.
बॅण्ड वादकांना लवकरच परवानगीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:45 PM