शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

‘यंग ब्रिगेड’ कडून जिल्हा परिषदेला अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:44 AM

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकविसीच्या जिल्हा परिषदेत तिशीची तरुणाई अर्थात ‘यंग ब्रिगेड’ या पंचवार्षीकला भाव ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकविसीच्या जिल्हा परिषदेत तिशीची तरुणाई अर्थात ‘यंग ब्रिगेड’ या पंचवार्षीकला भाव खावून जाणार आहे. ५६ पैकी तब्बल १९ सदस्य हे तिशीच्या घरातील आहेत. तरुणाईची ही फौज जिल्हा विकासात मोलाची भर घालण्यासाठी अभ्यासपूर्ण कामकाज जिल्हा परिषदेत करेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषद स्थापन होऊन २१ वर्ष झाले आहेत. २१ वर्षातील ही पाचवी निवडणूक आहे. आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत अनेक ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या कार्यक्षमतेने जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभाग घेत जिल्हा विकासात मोलाची भर घातली आहे. यंदाच्या निवडणुकीत ७० टक्के निवडून आलेले सदस्य हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढणार आहेत. त्यात ३५ टक्के सदस्य हे अवघ्या ३० ते ३५ वयाचे आहेत. आता या सदस्यांकडून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.तरुण व उच्च शिक्षीत देखीलजिल्हा परिषदेत जे तरूण सदस्य निवडून आले आहेत त्यापैकी ९० टक्के सदस्य हे उच्च शिक्षीत आहेत. किमान पदवीपर्यंतचे शिक्षण काहींनी घेतलेले आहे. त्यामुळे तरुण आणि शिक्षण त्यात राजकारण असा त्रिवेणी संगम या सदस्यांच्या बाबतीत असून त्यांचा त्या त्या क्षेत्रातील अभ्यास जिल्हा परिषद चालवितांना संबधीत सत्ताधारींना मोलाची मदत करणारा ठरणार आहे.हे आहेत तरुण सदस्यनिवडून आलेल्या तरूण सदस्यांमध्ये कोपर्ली गटातील अ‍ॅड.राम रघुवंशी, उमराण गटातील अजीत नाईक, भरडू गटातील मधुकर नाईक, रायसिंगपूर गटातील शंकर पाडवी, तोरणमाळ गटातील गणेश पराडके, नांदर्खे गटातील अर्चना गावीत, अमोणी गटातील अ‍ॅड.सिमा वळवी, धानोरा गटातील राजश्री गावीत, म्हसावद गटातील अभिजीत पाटील, आष्टे गटातील देवमन पवार, सुलतानपूर गटातील कविता पावरा, खेडदिगर गटातील वंदना पटले, मोहिदेतर्फे शहादा गटातील जिजाबाई ठाकरे, खापर गटातील भूषण कामे, आमलाड गटातील पार्वती गावीत, अक्कलकुवा गटातील कपील चौधरी, गंगापूर गटातील जितेंद्र पाडवी, रोषमाळ खुर्द गटातील संगिता पावरा आणि बोरद गटातील सुनिता पवार यांचा समावेश करता येईल.अनेकांना राजकीय पार्श्वभूमीनिवडून आलेल्या या तरुण सदस्यांपैकी अनेकांना राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. कुणाचे वडील, कुणाचे आजोबा, कुणाचे काका तर कुणाचे काका हे राजकारणातील सक्रीय नेते आहेत. तर काहींना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना निवडून आलेले आहेत.राजकीय पार्श्वभूमी असो किंवा नसो, परंतु तरुणाईचे सळसळते रक्त आता विकास कामांमध्ये सहभाग घेणार आहे. ग्रामिण भागातील प्रश्न मांडणार आहे. जे प्रश्न समजणार नाही ते समजून घेत सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या यंग ब्रिगेडकरून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.जिल्हा परिषदेत अनेकजण प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना ग्रामविकासाच्या योजना, जिल्हा परिषदेचे कामकाज याची माहिती देण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे अपेक्षीत आहे. तसे झाल्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभाग घेता येईल. गेल्या काही पंचवार्षिकमधील सदस्यांना कामकाजाची माहिती, योजनांची माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहात कुणी फारसे प्रश्न उपस्थित करीत नव्हते. परिणामी नेहमीचेच चेहरे प्रश्न उपस्थित करीत असल्याचे दिसून येत होते. यावेळी तसे होऊ नये, सर्वच सदस्यांनी विशेषत: तरुण सदस्यांनी कामकाजात सहभाग घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अशा सदस्यांना प्रशिक्षण करणे आवश्यक आहे.