कोठार : चाळीसगाव तालुक्यातून कडब्याची मागणी वाढल्याने तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील चाऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ बाहेरील जिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी असतानाही सर्रासपणे जिल्ह्याबाहेर चाºयाची वाहतूक केली जात आहे़जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणली होती. या आदेशान्वये जिल्ह्यातील चारा परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील वाहतुकीवर बंदी घातली गेली आहे. परंतु जिल्ह्यात चारा वाहतूक व निर्यातबंदी असताना चाºयाची सर्रास विक्री व वाहतूक होत आहे़ चाºयाच्या जिल्ह्याबाहेर होणाºया वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तळोदा तालुक्यातील पशुपालकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे़ चाºयाची जिल्हाबाहेर होणारी विक्री व वाहतूकीवर आळा बसावा यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी ‘चेकपोस्ट’ उभारले होते. मात्र चेकपोस्ट उभारणी करूनदेखील चारा निर्यात रोखण्यात यश आलेले दिसत नाही.दिवसाढवळ्या सर्रासपणे चाराची जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्री होत असताना याबाबत प्रशासन एवढे अनभिज्ञ कसे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना प्रशासनाने या विषयाकडे संवेदनशीलपणे बघण्याची गरज असताना प्रशासन मात्र चारा वाहतूक बंदीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे़तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात उत्पादित होणाºया कडब्याला दरवर्षी चाळीसगाव, कन्नड, पारोळा, धरणगाव, पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा, चिमठाणे, परिसरात मोठी मागणी असते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्वारी, मका यांसारख्या पिकांचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. त्याचा परिमाण कडबा उत्पादनावरदेखील झाला आहे. यावर्षी कडब्याचे उत्पादन कमी आहे. तरीदेखील चाळीसगाव परिसरात कडब्याची मागणी वाढली आहे. साडेचार हजार ते सात हजार प्रती शेकडा असा दर कडब्याच्या पेंढ्याला मिळत आहे़ तळोदा, अक्कलकुवा परिसरातून अन्य भागात चारा निर्यात करणारी साखळी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातून अजूनही दररोज दहा ते पंधरा ट्रक चाºयाची वाहतूक करीत आहेत़ प्रशासनाकडून आडकाठी येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी चारा वाहतूक करण्याची नामी शक्कल जिल्हा बाहेरील चारा वाहतूकदारांनी शोधून काढली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या नियोजन व तयारीत व्यस्त आहे. याचा फायदा घेऊन तळोदा, अक्कलकुवा परिसरातून चाºयाची वाहतूक करणाऱ्यांनी घेतला आहे़ त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत बाहेर जाणाºया चाºयाची वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे़
आदेश झुगारुन जिल्ह्याबाहेर होतेय चाऱ्याची निर्यात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:19 PM