लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रमीत वातावरण निर्माण झाले होते. तथापि, पक्षांतर करणा:या नेत्यांना मात्र निवडणुकीत यश मिळाले नाही.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नवापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवापूर मतदारसंघात भजपचा प्रभाव यापूर्वी फारसा नव्हता. त्यामुळे भरत गावीत यांच्या रुपाने पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला होता. परंतु निवडणुकीत मात्र त्यांना यश मिळाले नाही. आतार्पयतच्या विधानसभा निवडणुकीत भरत गावीत यांना अर्थात भाजपला याठिकाणी सर्वाधिक मते मिळाली पण विजय गाठता आला नाही. त्यामुळे याठिकाणी पक्षांतराच्या राजकारणाला अपयशच आले.माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना भाजपने या वेळी उमेदवारी नाकारली. ते शहादा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु त्यांच्याऐवजी पक्षाने त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी केली. याठिकाणी भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देऊन काँग्रेसने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या या प्रयत्नालाही यश लाभले नाही.माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनीदेखील ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेची जिल्ह्यातील एकमेव जागा असलेल्या अक्कलकुवा येथे पक्षाला फायदा होईल, असे गृहीत मानले जात होते. रघुवंशी यांनीदेखील अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे प्रतिष्ठापणाला लावली होती. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेला यश मिळाले नाही. मात्र शिवसेनेला अक्कलकुव्यात इतिहासात प्रथमच सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नंदुरबार येथे भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांना युतीमुळे फायदा झाला पण अक्कलकुव्यात मात्र पक्षाच्या उमेदवाराला यशार्पयत ते पोहचवू शकले नाहीत. आता भविष्याच्या राजकीय वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पक्षांतराच्या राजकारणाला जिल्ह्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:50 AM