लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या नंदुरबार शहरात ‘फॅन्सी’ नंबरप्लेटचा सुळसुळाट दिसून येत आह़े याकडे वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत आह़े वेडेवाकडय़ा तसेच नियमबाह्य ‘फॉन्ट’ असलेल्या नंबरप्लेटची शहरात रेलचेल असल्याचे दिसून येत आह़ेमोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटसाठी काही नियमावली आखून देण्यात आली आह़े त्यानुसार ठरावीकच प्रकारचा ‘फॉन्ट’ नंबरप्लेटवर वापरण्यात येत असतो़ परंतु बहुतेक वेळा वाहनधारकांकडून नियमबाह्य फॉन्टचा वापर करुन ‘नंबरप्लेट’ बसविण्यात येत आह़े यात, सर्वाधिक ‘इटालिक’ फॉन्टला अधिक मागणी असल्याचे रेडीयम व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़ेअनेकवेळा तर वाहनांच्या नंबरप्लेटवर, नंबरदेखील टाकला जात नाही, एखादे बोधचिन्ह टाकूनच विषय संपवला जात आह़े त्याचप्रमाणे बहुतेक वाहनधारकडून नंबरप्लेटवर ठराविक नाव तयार होईल असा नंबर आरटीओ विभागाला भलीमोठी रक्कम अदा करुन मिळवण्यात येत आह़े त्यामुळे यातून आपली ‘स्टेट्स व्हॅल्यू’ जपण्याचा प्रयत्न वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, काही वाहनांवर नंबरदेखील टाकण्यात आला नाही त्यामुळे समजा असेच एखादी वाहन समाजविघात कृत्यासाठी वापरले गेल्यास ते वाहन ओळखण्यासाठीदेखील वाव नसेल़ त्यामुळे यातून जनसामान्यांना मोठा धोकादेखील निर्माण होऊ शकतो़ शिवाय चोरीची वाहनेदेखील ओळखता येणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहिम राबविण्याची अपेक्षा आता सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़े
फॅन्सी’ नंबरप्लेटचा नंदुरबारात सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:05 PM