ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी परिसरात सद्य: स्थितीत कडाक्याची थंडी जाणवत असल्याने ब्राrाणपुरीसह परिसरातील केळी पिकावर करपा व चरका रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. केळी पिकावरील करपा रोग उत्पादकांसाठी अडसर ठरत आहे.ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या कांदे बाग शिवाय मार्च व एप्रिलमधील नवीन केळी लागवडीवरही करपा व चरकाचा प्रादुर्भाव होत आहे. सद्य:स्थितीत केळी बाग निसवणीच्या मार्गावर आहेत. चांगल्या प्रतिच्या व सरासरीसाठी उत्पादक लागवडीपासूनही आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली व महागडी औषधी यामध्ये केळी उत्पादकांचा मोठा खर्च होत आहे. येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात कापणीवर येणा:या या केळी बागांमध्ये कापणीवर येणा:या या केळी बागांमध्ये आजच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या कडाक्यातील थंडीने केळी बागांचा पोंगा शिवाय खालच्या बाजुकडील केळी पानांवर लाल तांबूस रंगाचे ठिपके शिवाय केळी पानाच्या कडा अक्षरश: जळाल्यासारख्या करपत आहे. यामुळे ऐन केळी बाग निसवणीच्या आलेल्या केळी खोडास विलंब लावणे. खोड निसवल्यास कमी फन्या लागणे, असे परिणाम होत आहे. वजनात घट व अनेक केळी रोग निसवण क्षमता कमी होणे यासर्व परिणामामुळे उत्पादकांनी लावलेला खर्च ही निघू शकणार नाही. उत्पादक या करपा व चरकामुळे हवालदिल होत आहे. अद्यापर्पयत लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून, तो वाया जाण्याच्या शक्यतेने उत्पादक हादरले आहेत. त्यातच भावाची चढ उतार व कमी भावात मागणी यामुळे उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. (वार्ताहर)केळीवर करपा पडला आहे. त्यामुळे त्याचा थेट उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून, शेतक:यांनी वापरलेल्या महागडय़ा बियाण्यांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. या रोगामुळे शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडला आहे.
केळीवर ‘करपा’ने शेतकरी हवालदिल
By admin | Published: January 25, 2017 12:13 AM