शहादा : तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी समाधान कारक पाऊस झाला असून, सध्या रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत असून, एका खाजगी दुकानदाराकडे खत उपलब्ध झाल्याने शेतक:यांनी खत खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या वेळी खताचासाठा वाढविण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.पावसाळा सुरू होवून दीड-दोन महिने पूर्ण होत आले. तालुक्यात सरासरी 142.78 मिलि मीटर पावसाची नोंद झाली असून, गत वर्षाच्या तुलनेत जुलै अखेरपेक्षा सुमारे 45.56 मिलि मीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.खरीप हंगाम सुरू असल्याने शेतक:यांनी कापूस, मूग, मका, ज्वारी, बाजरी, केळी व पपई आदी पिकांची लागवड केली आहे. पीक लागवड करून महिने-दीड महिन्याचा कालावधी लोटला असल्याने निंदणी, कोळपणीची कामे शेत शिवारात झाल्याचे दिसून येते. तुरळक पावसामुळे सध्या पीक तगधरून आहेत.पिकांची वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यासाठी युरीया, पोटॅश, अशा विविध महत्त्व पूर्ण खतांचा तुटवडा सध्या जाणवत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शेतकरी रासायनिक खतांसाठी कृषी केंद्रावर भटकंती करीत आहे. कृषी केंद्रावर माल नसल्याने शेतक:यांना परत फिरावे लागत आहे.दरम्यान मोजक्या काही कृषी केंद्रांवर रासायनिक खतांचा साठा करीत शेतक:यांना वेठीस धरले जात आहे. अल्पभूधारक सामान्य शेतक:यांच्या शेतीसाठी रासायनिक खत वेळेवर न मिळाल्यास पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन प्रकाशा रोडवरील खत विक्रेत्याकडे युरीया खत उपलब्ध झाल्याने शेतक:यांनी पहाटेपासूनच खत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. यात महिलांचीही लक्षणिय गर्दी दिसून आली. दरम्यान संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
खतांच्या खरेदीसाठी शेतक:यांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:47 PM