लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रोझवा लक्कडकोट, कोठार, वरपाडा गावातील शेतकरी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित राहत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.या गावांमधील शेतक:यांनी मागील चार ते पाच महिन्यांपासून आपापले बँक पासबुक, आधारकार्डसह कागदपत्रे संबंधित तलाठय़ांमार्फत प्रशासनाकडे तीन ते चार वेळा जमा करूनही अद्यापपावेतो या योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये अद्याप मिळालेली नाही. रोझवा पुनर्वसन येथील 211, रोझवा 55, कोठार 59 तर लक्कडकोट 32 या शेतक:यांनी तळोदा प्रशासनाकडे कागदपत्रे जमा करूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच शेतक:यांकडून अद्यापही वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.रोझवा पुनर्वसनसह परिसरातील शेतक:यांचे बँक खाते हे बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा येथे असून, सरदार सरोवर तसेच शासनामार्फत विविध अनुदानाचे व्यवहार बँकेतूनच होत असतात. मात्र तळोदा प्रशासन व संबंधित बँकेच्या गलथान कारभारामुळे बँकेचे खाते नंबर अद्यावत नसल्याचे दाखवण्यात येत असून, या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. परंतु या खातेनंबरवर व्यवहार चालू असून, ते अद्यावत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. तरी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून शेतक:यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
किसान सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:34 PM