लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : शेतक:यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे डीवायएसपी माहरु पाटील यांच्यासह दोषी पोलिसांवर निलंबणाची कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी शेतक:यांनी शहादा पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा काढला़ या वेळी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होत़ेहरभरा व गव्हाच्या खरेदीसाठी योग्य हमीभाव मिळावा यासाठी शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आह़े या आंदोलनकत्र्यावर पोलीस अधिकारी व कर्मचा:यांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने याला सोमवारी हिंसक वळण लागले होत़े़ पोलिसांच्या लाठीचाजर्मध्ये राजू पाटील या शेतक:याला गंभीर इजा झाली असून त्याला उपचारार्थ नाशिक येथे पाठविण्यात आले आह़े ब्रेन हॅम्ब्रेजची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याची स्थिती गंभीर आह़े पोलिसांच्या या अमानुष लाठीचाजर्मुळे शेतकरी संतप्त झाले आहेत़ या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हजारो शेतक:यांनी शहादा येथील पोलीस ठाण्यात मोर्चा काढला होता़ उपविभागीय पोलीस अधिक्षक माहरु पाटील यांच्यासह लाठीचार्ज करणा:या पोलिसांची चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत करा व दोषी आढळणा:यांना निलंबित करा अन्यथा राज्यभरात हे आंदोलन पेटेल व मुख्यमंत्र्यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाऱ्
शहाद्यात लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:49 AM