लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : तापीचे पाणी कोळद्यार्पयत आणून सिंचनाची सोय करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी कोळदा येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलतांना केले.कोळदा येथे रविवारी काँग्रेस मेळाव्यासह विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नंदुरबारच्या नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, जि.प.सभापती दत्तू चौरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती भरत पाटील, सरपंच रतमीबाई भिल आदी उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, शेतकरी हिताची जाणीव असलेला केवळ काँग्रेस पक्ष आहे. शेतक:यांना कजर्माफी व इतर मागण्यांसाठी एक हजार किलोमिटर पायी जावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकत्र्यानी कामाला लागावे. सध्या आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा अफवा उठविल्या जात आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपक पाटील यांनी तापीवरील उपसा सिंचन योजना लवकरच पुर्ण होणार आहे. त्यासाठी प्रय} सुरू आहेत. सातपुडा कारखान्याने शेतक:यांच्या नोंदणी केलेल्या उसाला 2400 रुपये टन भाव दिला तर कापसाला 5100 रुपये क्विंटल भाव दिला असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सुभाष राजपूत यांनी केले. आभार माजी जि.प. सदस्य भरत पाटील यांनी मानले. तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतक:यांच्या प्रश्नांची जाण काँग्रेसलाच कोळदा येथे चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:25 PM