लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक:यांची प्रचंड दमछाक होत आहे. सव्र्हर डाऊनच्या समस्येचा फायदा उचलत काही केंद्र चालकांनी कमाई सुरू केली आहे. जिल्ह्यात 100 पेक्षा अधीक केंद्रांमध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. दरम्यान, आतार्पयत जिल्ह्यातील 50 हजार शेतक:यांनी नोंदणी केली असून 43 हजार ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आले आहेत.शेतकरी कजर्माफीसाठी जिल्ह्यातील महाईसेवा केंद्राच्या 42 पैकी 39 केंद्रांवर तर आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींच्या 60 पेक्षा अधीक केंद्रावर आणि कॉमन सव्र्हीस सेंटर अर्थात सीएससी केंद्रावर ही सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज निशुल्क भरण्याचे प्राविधान आहे. परंतु सव्र्हर डाऊनच्या नावाखाली शेतक:यांची फिरवाफिरव सुरू आहे. अनेक वेळा बायोमेट्रीक अंगठा घेण्यास अडचण येत आहे. परिणामी शेतकरी हैराण होत आहेत. ही संधी साधून काही केंद्र चालकांनी कमाई सुरू केली असून शेतक:यांकडून 100 ते दीडशे रुपये घेतले जात आहेत. अनेकांची दुकानदारीग्रामिण भागात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. फॉर्म घरबसल्या भरून देण्याच्या नावाखाली किमान दीडशे रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. घरीच अर्ज भरून घेतले जातात. ते अर्ज ऑनलाईन अपलोड करून केवळ शेतक:यांचे अगंठे घेण्यासाठी त्यांना केंद्रात बोलविण्यात येते. जे शेतकरी पैसे देत नाहीत त्यांना दोन ते तीन दिवस फिरवाफिरव केली जाते. यामुळे शेतकरी हैराण होत आहेत. याबाबत अनेक शेतक:यांनी संबधीत अधिका:यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.अंगठा घेण्यातही अडचणीआधार कार्ड नोंदणीच्या वेळी बायोमेट्रीकद्वारे घेतलेला अंगठा आता दोन ते तीन वर्षानंतर मॅच होत नसल्यामुळे अनेक शेतक:यांना ती अडचण देखील सहन करावी लागत आहे. शेती कामात नेहमीच राबणा:या शेतक:यांना या अडचणींना मोठय़ा प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे. त्याचाही उपयोग काही केंद्रचालक करून घेत आहेत. 43 हजार अजर्जिल्ह्यात एकुण पात्र लाभार्थी शेतक:यांपैकी 50 हजार शेतक:यांनी अर्जाची नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास 43 हजार शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. महाऑनलाईन केंद्र, आपले सरकार अर्थात संग्राम केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर अर्थात सीएससी या केंद्रांवर निशुल्क अर्ज भरले जात असून 15 सप्टेंबरच्या आत शेतक:यांनी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागात अडचणी येत आहे. दुर्गम भागात इंटरनेट सेवेची सर्वाधिक अडचण आहे. याशिवाय वीज नसणे, पावसामुळे शेतक:यांना संबधीत ठिकाणी जाण्यास अडचणी येत आहेत. सध्या शेती कामांचे दिवस असतांना ते सोडून अर्ज दाखल करण्यासाठी पती-प}ी यांना सोबत जावे लागत आहे. परिणामी शेती कामांवरही परिणाम दिसून येत आहे. रांगा कायमअर्ज दाखल करण्याच्या केंद्राबाहेर शेतक:यांच्या रांगा कायम आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपासूनच अशा केंद्रांबाहेर मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत असल्याचे चित्र आहे. केंद्राबाहेर ऊन किंवा पावसापासून संरक्षणासाठी कुठलीही सोय नसल्यामुळे या अडचणींना तोंड देत शेतक:यांना केंद्राबाहेर बसावे लागत असल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
अर्ज भरताना शेतक:यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 11:49 AM
43 हजार अर्ज दाखल : ग्रामीण भागात एजंटांचा सुळसुळाट, कारवाईची मागणी कजर्माफी
ठळक मुद्दे15 सप्टेंबर शेवटची मुदत.. कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे अवघे सहा दिवस त्यासाठी उरले आहेत. शासकीय सुटीच्या दिवशी देखील महाईसेवा केंद्र, आपले सरकार व सीएससी केंद्र सुरू राहणार आहेत. कजर्माफी अर्ज दाखल केलेल्