वाण्याविहीर : 10 किलोमीटर अंतरावरील चढावावरून वाहणा:या नदीमधून पाट तयार करून गुलीआंबा येथील कोरडवाहू शेतक:यांनी चारीद्वारे शेतात पाणी आणून पिके जगविण्यासाठी प्रय} केला जात आहे.तळोदा तालुक्यातील सावर व सावर गावाजवळ अक्कलकुवा तालुक्यातील गुलाआबा व परिसरातील शेतक:यांची कोरडवाहू शेती आहे. या शेतक:यांनी भात, दादर, हरभरा, तूर, मका, ज्वारी, सोयाबीन ची पेरणी केली होती. मात्र समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतक:यांनी पिकांवर केलेला खर्चही न निघाल्याने कर्जाचा बोजा पडला आहे. त्यातच शासनानेही दुष्काळी भाग म्हणून तालुक्याला वगळल्याने निराशा पदरी पडलेल्या कोरडवाहू शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावर परिसरातील कोरडवाहू शेतक:यांनी 10 किलोमीटर अंतरावर केलखेडी गावाच्या पायथ्याशी वाहणा:या मोठी नदीच्या पाण्याला गुलीआंबा गावाच्या उतार रस्त्याच्या बाजूच्या उतार भागातून पाटचारी तयार केली आहे. सावर परिसरातील सावर, गुलीआंबा, इच्छागव्हाण या परिसरातील 30 ते 35 कोरडवाहू शेतक:यांनी सुमारे 50 एकर कोरडवाहू क्षेत्राती शेतातील भात, हरभरा, दादर, तूर, मका आदी पिकांना आळीपाळीने पाणी देऊन पिके जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असून त्यात अक्कलकुवा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतक:यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पिकांची व पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेऊन या तालुक्याचाही दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
दुर्गम भागातील शेतक:यांची पिके जगविण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:17 PM