- राजू पावरा/संतोष सूर्यवंशीनंदुरबार - धडगाव परिसरात बटाट्याची लागवड करण्यासाठी शेतकºयांचा कल वाढत आहे़ ‘कुफरी ज्योती’ या बटाट्याच्या वाणाच्या माध्यमातून येथील शेतकरी लाखोंची उलाढाल करीत आहेत.बटाट्यावर येणारा करपा तसेच साठवणुकीसाठी येथे वाव नसल्याने शेतकºयांकडून बटाटा लागवडीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते़ परंतु आता पुन्हा शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत बटाटा लागवडीकडे वळले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे़ भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीअंतर्गत डॉ़ हेडगेवार सेवा समिती संचलित नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रातर्फे धडगाव येथे ‘निक्रा’ हा प्रकल्प तालुक्यातील उमराणी येथे सुरु करण्यात आला आहे़हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे प्रयोग येथे होत असतात़ सातपुड्यातील धडगाव तालुक्यात इतर भागाच्या तुलनेत हवामान थंड आहे़ खरीप पिकानंतर अवघे १० गुंठे एवढेच क्षेत्र बागायती पिकासाठी ठेवण्याची क्षमता येथील शेतकºयांची असते़ हलक्या जमिनीत पाण्याची सोय असलेले शेतकरी बागायती पिके घेत असतात. बटाटा हे पिक कमी कालावधीचे थंड हवामानात तसेच मध्यम ते हलक्या जमिनीत घेता येते़ ‘निक्रा’ या प्रकल्पाअंतर्गत बटाटा या पिकाचा चाचण्या भुजगाव, उमराणी, सूर्यपूर, या परिसरात घेण्यात येत आहे़ सद्यस्थितीत पिक हे ५५ ते ६० दिवसांचे असून बटाट्याच्या पोषणाची अवस्था सुरु आहे़ ‘कुफरी ज्योती’ हा बटाटा वाण येथे अनेक शेतकºयांनी लावला आहे. याचा कालावधी ९० दिवसांचा असतो, तसेच ह्या वाणाची टिकवणक्षमता ही चांगली आहे़ म्हणून हा वाण लागवडीसाठी वापरला जातो. पाण्याची स्थिती पाहता गव्हापेक्षा आर्थिकदृष्ट्या हा वाण फायदेशीर ठरतो़ धडगाव परिसरातील धनाजे, सूर्यफुल, उमराणी, भुजगाव, शिवनीपाडा येथील शेतकºयांच्या शेतात सद्यस्थितीत यांचे प्रात्याक्षिक सुरु आहे़ नाना पावरा, धाकलसिंग पावरा, सुभाष पावरा, मोचडा पावरा यासह अनेक शेतकºयांनी या वाणाची यशस्वीरित्या लागवड केली आहे़ कोंब आलेल्या बटाट्यांचा बेणे म्हणून वापरकुफरी ज्योती याचा वाणाचा वापर करुन शेतकºयांकडून बटाटा पिकाची लागवड करण्यात येत आहे़ शिवाय कोंब आलेल्या बटाट्यांचा बेणे म्हणूनदेखील वापर करण्यात येत आहे़ पारंपारिक गहु पिकापेक्षाही बटाटा पिकाची लागवड व काढणी सोपी असल्याचे म्हटले आहे़ दरम्यान, बटाटा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यावरही हे वाण रामबाण उपाय म्हणून समोर आले आहे़ब-याच वर्षांनंतर धडगाव तालुक्यातील शेतकरी आता बटाटा लागवडीकडे वळलेला दिसून येत आहे़ गहुच्या तुलनेत बटाट्याची लागवड व काढणीदेखील सोपी आहे़-रवींद्र पाटील,विषय विशेषज्ञ कृषीविज्ञान केंद्र, नंदुरबार
शेतक-यांचा पारंपरिक पिकांना फाटा, ‘कुफरी ज्योती’ वाणाव्दारे बटाटा पिकाची लागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 7:58 AM