रांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा, तळवे, रांझणी परिसरात मृद संधारणासाठी शेतकरी सरसावले आहेत़ शेतजमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी शेतजमिनीचे सपाटीकरण तसेच सुपीक गाळ शेतात टाकण्याचे काम वेगात सुरू झाले आहे़सातपुडा पायथालगतच्या ह्या पट्ट्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतो़ त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या माºयाने पाण्याच्या वेगवान प्रवाहाने तसेच वेगवान वाºयाच्या झोताने जमिनीतील क्रियाशील सूक्ष्म पोषण कण वाहून जात आहेत़ यामुळे जमिनीच्या सुपिकतेवर याचा परिणाम होत असल्याचे परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे़ मृदा वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात मृदेची धूप होत असते़ यामुळे शेतजमिनीची सुपिकता कमी होत असल्याने जमिनीमधील बहुतांश पोषक कण हे पाण्यासोबत वाहत असतात़ यामुळे सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी परिसरातील शेतकºयांकडून प्रयत्न केले जात आहे़ यावर उपाय म्हणून शेतकºयांकडून जवळच्या लघुप्रकल्पातून सुपीक गाळ वाहतूक करुन शेतात आणला जात आहे़ तसेच तो गाळ पसरवून सपाटीकरण केले जात आहे़ दरम्यान, सध्या गढावली लघुप्रकल्पातून गाळ वाहतूक करण्यात येत आहे़ तसेच काही शेतकºयांकडून शेतीचे सपाटीकरणही टॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येत आहे़ यामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध उपाय योजना करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरात या विषयी तालुका कृषी विभागाकडून शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे़ मृदा संवर्धन काळाची गरज असल्याने शेतकºयांना जास्तीत जास्त पिकाच्या उत्पादनासाठी पोषक मृदेची आवश्यकता आहे़ त्यामुळे या मृदेची धूप होण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सरसावले आहे़ प्रशासनाकडून शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़ (वार्ताहर)गेल्या तीन वर्षांच्या शेती उत्पन्नांचा आलेख पाहिल्यास उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे परिसरातील जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़़ सुपीक मृदेची धूप होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मृदा संवर्धनाची गंभीर दखल घेतली आहे़ सुपीक मृदेसाठी परिसरात शेतकºयांनी सपाटीकरणाला प्राधान्य दिले आहे़ सुपीक मृदेमुळे पिकाच्या उत्पादनास याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे़
मृद् संधारणासाठी सरसावले शेतकरी
By admin | Published: March 09, 2017 11:44 PM