लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : गेल्या महिनाभरापासून मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत़ त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याला उठाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतक:यांमध्ये कमालीची चिंता दिसून येत आह़े जिल्ह्यातील पश्चिम भागातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकाची आवक होत आह़े त्यामुळे साहजिकच भाजीपाल्याचे भाव गडगडत आहेत़ अनेक भाज्या 4 ते 5 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येत आह़े त्यामुळे एकीकडे भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने गृहिणींकडून समाधान व्यक्त होतेय तर, दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतक:यांकडून मात्र चिंता व्यक्त करण्यात येत आहेत़भाजीपाल्याचे भाव किलोप्रमाणेमेथी 20 रुपये, पालक 10 रुपये, भोपळा 5 रुपये, कोथंबिर 10 ते 12 रुपये, कोबी 20 रुपये, गड्डा 5 रुपये, वांगे 7 ते 8 रुपये, मिरची 7 ते 8 रुपये, शिमला मिरची 12 रुपये, गिलके 10 ते 12 रुपये, डोळके 20 रुपये, गवार 7 ते 8 रुपये, कांदा 5 रुपये, बटाटा 14 रुपये, टमाटा 5 रुपय़ेभाव नसल्याने भाजीपाला सडलादरम्यान, मालाची आवक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने शेतक:यांच्या भाजीपाल्याला व्यापा:यांकडून भाव देण्यात येत नसल्याचा आरोप शेतक:यांकडून करण्यात येत आह़े तसेच मालाचा दर्जा निकृष्ट असल्याचेही कारण अनेक वेळा व्यापा:यांकडून पुढे करण्यात येत असत़े त्यामुळे मालाला उठाव नसल्याने भाजीपाला तेथेच सडत असल्याचेही अनेक शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े कोथंबिर, लिंबू, डोळके, मेथी वगळता इतर सर्व भाज्यांचे भाव अक्षरश कोसळले असल्याचे दिसून येत आह़े अनेक भाज्या 4 ते 5 रुपये किलो प्रमाणे विकल्या जात आह़े भाज्यापेक्षा जनावरांसाठी लागणा:या चा:याचे भाव अधिक असल्याने काही हतबल शेतक:यांकडून मेहनतीने उगवलेला भाजीपाला जनावरांना चरायला टाकण्यात येत असल्याची भिषण स्थिती निर्माण झाली आह़े
नंदुरबारात भाजीपाल्याला उठाव नसल्याने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:45 PM