लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : गावातील मूलभूत सुविधा अन् ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत सातत्याने मागणी करूनही पंचायत समितीची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ रोझवा प्लॉट, ता.तळोदा येथील गावक:यांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान गट विकास अधिका:यांनी गावातील सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याबरोबरच ग्रामसेवकांचीही बदली करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावक:यांनी उपोषण मागे घेतले. तळोदा तालुक्यातील रोझवा प्लॉट या गावाची लोक संख्या साधारण 500 आहे. सदर गाव हे धवळीविहीर ग्रामपंचायतीत समाविष्ठ केले आहे. परंतु या गावात अंतर्गत रस्ते, गटारी, पाणीपुरवठा या सारख्या प्राथमिक सुविधांची वाणवा आहे. याशिवाय गावक:यांनी घरकुल व शौचालयांचादेखील लाभ मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अगदी सपाटीवर असतांना सुद्धा गावाला जोडणारा रस्ता नाही, गावक:यांना पावसाळ्यात नदीतून जावे लागते. याविषयी पंचायत समिती व इतर यंत्रणांकडे अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार, आंदोलन छेडूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त गावक:यांनी मंगळवारी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. प्रारंभी गटविकास अधिकारी शरद मगर यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रय} केला होता. परंतु ग्रामस्थ तातडीने कार्यवाही करण्याचा पवित्र्यावर ठाम राहिल्याने उपोषणास बसलेच. शेवटी सायंकाळी पुन्हा मगर यांनी चर्चेचे आवाहन केल्यानंतर त्यांच्या दालनात प्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा झाली. या चर्चेत गावातील बंद पाणीपुरवठा लगेच सुरू करण्यात येईल. तसेच अंतर्गत रस्ते, गटारी, गावाला जोडणारा रस्ता, अंगणवाडी इमारत, थ्री फेज लाईटचा ताबडतोब प्रस्ताव तयार करून मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने गावक:यांनीही उपोषण मागे घेतले होते. या उपोषणात उपसरपंच हिरालाल पाडवी, यशवंत पाडवी, वनराज नाईक, छोटय़ा पाडवी, दिलवर पाडवी, राजेश पाडवी, जयवंत नाईक, शंकर नाईक, संजय नाईक, रतिलाल पाडवी, महेंद्र वळवी, कृष्णा पाडवी, सुकलाल पाडवी, जाजूबाई पाडवी, पिंटू तडवी, अरविंद तडवी, रायसिंग ठाकरे, अनिल तडवी, गणेश नाईक आदींसह महिलाही सामील झाल्या होत्या. दरम्यान गावक:यांच्या या उपोषणास इतर संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला होता.
रोझवा प्लॉट ग्रामस्थांचे पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:18 PM