नंदुरबार : शहरात भुरटय़ा चोरी करणा:या महिला दाखल झाल्या असून गेल्या तीन दिवसात त्यांच्याकडून चोरीचा प्रय} झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. पोलिसांर्पयत त्यांना नेण्यातही आले होते; परंतु कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, एखादी मोठी घटना घडण्याच्या आधीच त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरटय़ा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरी करणा:यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी सराफा बाजार परिसरात गोण्यांमध्ये सामान घेऊन पळणा:या महिलांना पकडून फडके पोलीस चौकीत आणण्यात आले होते. तेथे त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर शहरातील काही भागात उघडय़ा घरातून चोरी झाल्याचे प्रकार घडले. दुपारच्या वेळी वसाहतींमध्ये सहसा कुणीही राहत नसल्याची संधी साधत अशा प्रकारच्या चो:या केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिला दुपारच्या वेळी वस्तू विक्री करण्याच्या बहाण्याने गल्लोगल्ली किंवा वसाहतींमध्ये फिरून सावज हेरत असतात. संधी मिळताच हातसफाई करीत असल्याचेही प्रकार होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचा:यांची गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.चो:यांचे प्रमाण वाढल्याने जगतापवाडी परिसरातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी स्वत: जागता पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. युवक गटागटाने व आळीपाळीने रात्रीचा जागता पहारा देत आहेत. चो:यांवर नियंत्रण मिळविण्यात शहर व उपनगर पोलिसांना अपयश आल्यानेच नाइलाजाने नागरिकांना आता स्वत:च आपल्या परिसराचे रक्षण करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.
नंदुरबार शहरात भुरटय़ा चो:या वाढल्याने भीती
By admin | Published: February 06, 2017 12:12 AM