शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

स्थलांतर रोखण्यासाठी फेलोज काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवून डीएम अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवून डीएम अर्थात जिल्हाधिकारी फेलोजनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.निती आयोग आणि पिरामल फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘डीएम फेलोशिप’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचे कार्यक्रम संचालक सौमित्र मंडल, निती आयोगाच्या डीएम फेलोशिप कोअर ग्रुपचे सदस्य मनमोहन सिंग, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी बबन काकडे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, ग्रामीण भागात कृषीवनीकरणाच्या संकल्पनेवर भर द्यावा. प्रत्येक गावात शेततळे आणि रोपवाटीका उभारण्यासाठी प्रयत्न करावे. सांडपाणी व्यवस्थापन आणि शौचालयाच्या उपयोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनतेच्या बँक विषयक समस्या दूर करणे, प्रौढ शिक्षण, पोषण विषयक मार्गदर्शन अशा विविध क्षेत्राशी संबंधित कामाला प्राधान्य द्यावे.पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दुर्गम भागात शासनाच्या योजना प्रभाविपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने युवकांनी नव्या कल्पना सुचवाव्यात. जनतेशी संवाद साधून तेथील परिस्थितीचे आकलन करून घ्यावे आणि नागरिकांच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. परिवर्तनाची महत्वाकांक्षा मनात बाळगून कार्य केल्यास या प्रायोगिक उकप्रमाद्वारे देशात चांगला संदेश जाईल. देशाचे आकलन करण्याची आणि पुढील जीवनासाठी अनुभवाची शिदोरी प्राप्त करण्यासाठी ही चांगली संधी आहे.मंडल म्हणले, अकरा महिन्याच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांपासून शिकण्याची युवकांना संधी आहे. सिंग म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पोषण आदी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे उद्दीष्ट समोर ठेवावे. सोबत ही स्वत:चा विकास साधण्याची संधी आहे. जनसेवेची प्रेरणा हा या कार्यक्रमाचा गाभा आहे हे लक्षात घेऊन युवकांनी अधिकाधिक आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करावा. पुढील पिढीचे जीवन बदलण्याचे कार्य म्हणून ११ महिन्याच्या कालावधीतील कार्यक्रमाकडे पहावे आणि प्रशासन व जनतेच्या सहकायार्ने ग्रामीण भागात बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा वसुमना पंत यांनी व्यक्त केली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी युवकांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक किशोर घरत यांनी केले. श्रद्धा भोईटे, रा.पनवेल हीने सांगितले, ही जीवनातील एक चांगली संधी आहे. मला यामुळे ग्रामीण भागातील तळागाळाच्या लोकांचे काम, अडचणी सोडविण्यात आपला सहभाग देता येईल. फेलोशिपचा मला भविष्यात खुप अनुभव होईल. माझी निवड झाल्यामुळे मी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करते.

  • कार्यक्रमाचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिपसाठी ४,२३० उमेदवारांपैकी ५० युवकांची निवड करण्यात आली आहे. त्यातील दह नंदुरबार जिल्ह्यातील असून इतर २० राज्यातील व २० परराज्यातील आहेत. या कार्यक्रमासाठी निती आयोगाने एक कोटी २७ लाख मंजूर केले आहेत.
  • निवड झालेल्या युवकांना पुढील ११ महिन्यात जीवनातील वेगळा अनुभव प्राप्त होईल. त्यासाठी चांगली मानसिक तयारी आवश्यक आहे. आतापर्यंत प्राप्त केलेल्या ज्ञानाला परिसर अभ्यासाची जोड देत नव्या कल्पनांचे सृजन करता येईल. त्यातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे आणि हीच युवकांच्या कामाची प्रेरणा असावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकार यांनी व्यक्त केली.