शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ 8833) हा शहाद्याहून खताच्या गोण्या भरून गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक अंकलेश्वर-ब:हाणपुर  राज्यमार्गावरील अक्कलकुवा शहराबाहेरील एका हॉटेल नजीकच्या वळणार आला असता भरधाव              वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उतरला. अनियंत्रित वेगामुळे  वळणाचा अंदाज चुकल्याने हा ट्रक रस्त्यावरून खाली उतरला व           रस्त्याच्या कडेला  असणा:या खड्डयात जाऊन आदळला. भरधाव वेग असल्याने खड्डयात आदळलेला ट्रक पलटी  झाला. हा अपघात एवढा भीषण  होता की, रस्त्याच्या             कडेवरून उतरलेला हा ट्रक  आदळला जाऊन अक्षरश: चित्रपटातील दृष्यांमध्ये शोभावा अशा पध्दतीने पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ट्रकचे चारही चाके वरच्या दिशेला झाली असून ट्रक मधील खताच्या गोण्या  ट्रक खालीच दाबल्या गेल्या. या ट्रकमध्ये चालक व सहचालक यांच्यासह अजून दोन ते तीन जण बसले असल्याची माहिती देण्याचे आली आली. या भीषण अपघातात ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत़ अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्यमार्गावर दिवस-रात्र मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वाढलेली वर्दळ व दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेता राज्यमार्गावरील तळोदा ते अंकलेश्वर र्पयतचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून सुमारे दीड वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या मार्गावर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे दिसून येते. दर दिवसाआड राज्य मार्गावरील तळोदा ते  खापर दरम्यान वाहने पलटी  होण्याचे प्रकार घडून येतात. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने ही त्यामाग प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.