शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अखेर श्रमदानातून महामार्ग पुलाची दुरुस्ती

By admin | Published: February 08, 2017 11:33 PM

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग : जिल्हाधिका:यांनी वेळोवेळी आदेश देऊनही महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष

नवापूर : धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावरील रायंगण पुलावरील रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा झाली असून, या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत स्वत: जिल्हाधिका:यांनी लक्ष घालून वारंवार आदेश  देऊनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वत: टीकम पावडी घेत माती व मुरूम टाकून पुलावरील जीव घेणे खड्डे बुजवून प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रय} केला आहे.या पुलाची दुरुस्ती व खोल खड्डे भरण्याची वेळोवेळी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु पुलाची दुरुस्ती व खड्डे बुजवण्यात आले नाही शेवटी रायंगण व कोठडाच्या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास पाटील, पो.काँ.निजाम पाडवी, योगेश थोरात, मुकेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवलसिंग गावीत रायंगण गावांचे सरपंच अजित गावीत, कोठडा गावांचे सरपंच सुरेश गावीत, माजी उपसभापती दिनकर मावची पागराणचे सरपंच सुरेश गावीत, ग्रामस्थ, सदस्य विपूल वसावे,               अतुल ठिगळे, वीरसिंग कोकणी, महेंद्र गावीत, दामू गावीत, संदीप वसावे, भिमसिंग गावीत आदींनी पुलाच्या शेजारी असलेल्या शेतातून खोद           काम करून ती माती पुलाच्या  रस्त्यावर टाकून खड्डे बुजण्याचे काम केले. ब:याच वर्षापासून रायंगण गावाच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी या पुला संदर्भात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आलेले आहे. या हायवेवर रोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. रायंगण पूल हा 60 फूट उंच असल्यामुळे या पुलावर बरेच अपघात होऊन जीवित हानी झालेली आहे. मात्र कंत्राटदार व संबंधित अधिकारी या पुलावर दुर्लक्ष करीत आहे. या पुलावर या पुढे अपघात झाल्यास संबंधित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अधिका:यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रायंगण व कोठडा ग्रामस्थांनी केली आहे.या पुलाचे काम लवकर न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व नवसिंग गावीत यांनी दिला आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी पुलाचे संरक्षण कठडे व पुलाचा खालच्या भागातील पिलर दुरुस्तीचे काम स्वत: जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हे काम स्वत: उभे राहून काम सुरू केले होते व त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिका:यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी काम पूर्ण न करता अर्धवट सोडले आहे. या पुलावर एकतर्फी वाहनांची सुविधा करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी दिले होते. तसेच बेडकीपाडा, वाकीपाडा, रायंगण पूल, सावरट, विसरवाडी, कोंडाईबारी घाट येथे ही रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, अपघाताची वाट हे खड्डे पाहत आहे. खड्डे बुजविण्यासाठी राजू वसावे, प्रफुल्ल गावीत, मनोज गावीत, राणू गावीत, दामू गावीत, रहीम खान, नितीन गावीत आशिष गावीत, सुरेश गावीत व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.    (वार्ताहर)