लोकमत ऑनलाईनलहान शहादे, दि़ 22 : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांची परवड सुरू आह़े आरोग्य केंद्रात नियुक्तीस असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े शिंदे, खोडसगाव तसेच परिसरातील 10 गावांच्या ग्रामस्थांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन वावर असतो़ साथीच्या आजारांसह गर्भवती माता आणि लहान बालक याठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात़ मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर येतच नसल्याने रूग्णांचे हाल होत आह़े नंदुरबार- प्रकाशा रस्त्यावरील या आरोग्य केंद्रात आजघडीस नियुक्तीस असलेले डॉक्टर व इतर कर्मचारी नंदुरबार शहरात राहतात़ नंदुरबार येथून लहान शहाद्यार्पयत 20 मिनीटांपेक्षा कमी वेळ लागत असतानाही येथे दुपारी 2 वाजेनंतरच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा:यांचे आगमन होत़े तोवर त्यांची वाट बघत रूग्ण आवारात बसून असतात़ रूग्णांची सुरू असलेली हेळसांड थांबावी म्हणन ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही सुधारणा झालेली नाही़ जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रूग्ण आणि त्यांच्या तक्रारींची दखलही घेतलेली नसल्याने येथे येणारे रूग्ण कंटाळून नंदुरबार शहरात जावून खाजगी डॉक्टरकडून उपचार करून घेत आहेत़ आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने परिसरातील डॉक्टरांकडे जावून नागरिक उपचार घेत आहेत़ हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आह़ेसध्या या परिसरात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आह़े त्याठिकाणी विविध दुखापती होणारे मजूरही आरोग्य केंद्रात येतात़ त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने तेही नंदुरबारचा रस्ता धरतात़ गेल्या वर्षात आरोग्य केंद्रात शिबिरांचे तसेच संततीनियमन शस्त्रक्रियांची शिबिरे भरवण्यात आलेली नाहीत़ यामुळे गोरगरीबांना खाजगी रूग्णालयात या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत़
प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची परवड : लहान शहादे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:42 PM