शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

डबल दिवाळीतही फटाके बाजार ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने फटाक्यांवर काही अंशी बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्राहकांवर मोठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने फटाक्यांवर काही अंशी बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्राहकांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थिती दीपोत्सव शिवाय विधानसभा निवडणुकीचा निकालही लागला, त्यामुळे फटाके मोठी उलाढाल होईल, असे फटाके विकेत्यांमार्फत वर्तविण्यात आले होते. परंतु दुहेरी उत्सव असतानाही या बाजारात शुकशुकाट दिसून आला.   चार वर्षापूर्वी 2015 मध्ये शालेय विद्याथ्र्यानी  फटाक्यांमुळे होणा:या प्रदूषण  थांबविण्यासाठी फटाके विक्रीला विरोध केला. एवढेच नव्हे तर त्या विद्याथ्र्यांनी आपल्या पालकांमार्फत सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती.    यावर सुप्रीम कोर्टाने प्रदुषण     नियंत्रण मंडळ आणि काही   अभ्यासक व तज्ज्ञ संघटनांकडून फटाक्यांवर प्रतिक्रिया मागविल्या.   या प्रतिक्रियांनुसार विद्याथ्र्याच्या या याचिकेवर ऐन दिवाळीच्या तोंडावर सुप्रिम कोर्टाने काही अंशी           फटाके विक्रीवर बंदीचा निर्णय    दिला. या निर्णयात सरसकट फटाक्यांची विक्री करता येणार नसून केवळ नोंदणीकृत विक्रेत्यांनाच विकता येणार असल्याचे कोर्टाने बजावले. तज्ज्ञांकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियांमध्ये फटाका उद्योगामुळे हजारो कामगारांचा उदरनिर्वाह हात असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यामुळे पूर्णपर्ण बंदी घातली नाही. असे असतानाही दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलात  फटाक्यांचे अनेक स्टॉल लागले आहेत. सद्यस्थितीत दीपोत्सवासह जिल्ह्यात विधानसभेचा उत्सव देखील सुरू आहे. या दुहेरी उत्सवांमुळे नेहमीप्रमाणे यंदा फटाके बाजारातील दुपटीने भर पडणे अपेक्षित होते. त्यानुसार नंदरबार येथील फटाके विक्रेत्यांनी स्टॉलही लावले, परंतु ऐन दीपोत्सवाच्या कालावधीतच सर्वोच्च न्यायालयाने काही अंशी बंदीचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांची फटाके खरेदीबाबत   फारशी रुची दिसून येत नाही. निवडणूक निकालाच्या दिवशी तरी विक्री वाढल अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. परंतु या दिवशीही फटाके बारात शुकशकाट दिसून आला. त्यामुळे फटाके बाजारावर कोर्टाच्या निकालाचाच परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. नंदुरबारच्या या फटाका बाजारात अपेक्षेनुसार आर्थिक उलाढाल होत नसल्याचे तेथील विक्रेत्यांमार्फत सांगण्यात आले   आहे.