लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील ब्राrाणपुरी गावानजीक कापसाने भरून जाणा:या पीकअप गाडीला समोरून येणा:या मालवाहू टेम्पोने जबर धडक दिल्याने टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील शेतकरी कापूस विक्रीसाठी मध्य प्रदेशमधील खेतिया येथे मालवाहू पीकअप (क्रमांक एम.एच.48 टी-4627) गाडीत घेऊन जात होते. ब्राrाणपुरी ते चांदसैली दरम्यान समोरुन खेतियाकडून भरधाव वेगाने येणा:या टेम्पोच्या (क्रमांक एम.एच.12 एफ.डी. 3630) चालकाने रस्त्यावर पडलेल्या रस्ता कामाच्या साहित्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेत अचानक कापसाने भरलेल्या पीक अपला धडक दिली. धडक एवढी भयानक होती की जवळच असलेल्या चांदसैली येथील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत टेम्पो चालक गाडीत अडकले दिसून आल्याने त्याला काढण्यात आले. त्यात त्याच्या जीभेचे तुकडे तसेच पायाची अंगठी तुटल्याचे दिसून आले. जखमी चालकास तात्काळ नागरिकांनी शहादा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रस्ता कामामुळे अपघातकोळदा-खेतिया या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू होते. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यावरील कच्चे मटेरियल तसेच पडून राहिल्याने वाहनांना विरुद्ध दिशेने जावे लागते. त्यामुळे समोरून येणा:या पीकअप वाहनाला टेम्पो चालकाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
ब्राrाणपुरीजवळ अपघातात चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:00 PM