शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
4
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
5
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
6
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
7
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
8
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
9
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
10
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
11
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
12
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
13
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
14
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
15
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
16
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
17
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
18
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
19
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
20
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

जिल्ह्यात गट शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:09 AM

100 एकर क्षेत्रात दुधाळ पशुंसाठी हिरवे वैरणचे उत्पादन

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली असली तरी अद्याप या योजनेला आकार आला नाही. मात्र, याही स्थितीत काही नवीन करण्याचे धाडस आणि तंत्रज्ञानाचा वेध घेत फेस, ता.शहादा येथील 23 शेतक:यांनी एकत्र येत 107 एकर क्षेत्रात हिरवे वैरण उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. कमी शेती असलेल्या शेतक:यांनी एकत्र येवून पारंपारिक पिकांपेक्षा नवे तंत्र व शेतीतील नवीन प्रयोग राबवावेत किंबहुना आपल्या शेतात केवळ पिकाचेच उत्पन्न न घेता त्यावर प्रक्रिया करून तो माल बाजारात विकावा व शेतकरी विकसीत व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने गट शेतीची योजना दोन वर्षापूर्वी कार्यान्वीत केली. प्रत्येक जिल्ह्याला प्रायोगीक तत्वावर असे किमान पाच-पाच गट स्थापन करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र पहिल्या वर्षी त्याला फारसे यश मिळालेले नाही. नंदुरबार जिल्ह्यात फेस येथील शेतक:यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. येथील एकाच ठिकाणी शेती असलेले 23 शेतकरी एकत्र येवून त्यांनी गणराज शेतमाल उत्पादक गटाची स्थापना केली. त्यांच्या 107 एकर क्षेत्रात असा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरेश पाटील यांनी पुढाकार घेवून आपल्याला अवगत असलेले तंत्र तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी दुधाळ जनावरांसाठी हिरवे वैरण लावण्याची योजना तयार केली. अर्थात याबाबत सुरुवातीला ही योजना शेतक:यांच्या फारशी पचनी पडली नाही. मात्र त्यांनी त्यांचे प्रय} सुरू ठेवले. त्यांनी स्वत: थायलंडमध्ये उत्पादीत होणा:या चा:याचे बियाणे मागवून आपल्या शेतात प्रयोग सुरू केला होता. त्यालाच विस्तार करीत ते पुर्ण 107 एकर क्षेत्रात गट शेतीच्या माध्यमातून राबविला. बँकेकडून कर्ज मिळण्यास अडथळा आल्याने स्वत: शेतक:यांनी खर्च करून योजना यशस्वी करण्यासाठी प्रय} सुरू ठेवले. आज या ठिकाणी हिरव्या चा:याची अनोखी शेती तयार झाली असून त्याचे उत्पादनही सुरू झाले आहे. चांगल्या गुणवत्तेचा चारा या ठिकाणी उत्पादीत होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथील चा:याचे उत्पादन सुरू झाले असून रोज आठ ते दहा टन चा:याचे उत्पादन सुरू झाले आहे.