लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जागतिक एड्स निमरूलन दिनाचे औचित्य साधत शहाद्यात पाच एचआयव्ही बाधित जोडप्यांचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात तसेच मंगलमय वातावरणात पार पडला़ उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला़रविवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर शहादा उपविभागीय कार्यालयाच्या आवारात झालेल्या विवाह सोहळ्यास जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील मान्यवर उपस्थित होत़े 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या या उपक्रमाच्या प्रारंभी शहाद्यातून नवरदेवाची वरात काढण्यात आली होती़ शहाद्यातील मान्यवरांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग देत वरातीतही हजेरी लावली़ विवाहसोहळ्याआधी प्रास्ताविकात पोलीस उपअधिक्षक सपकाळे यांनी एचआयव्ही बाधित समविचारी जोडप्यांची माहिती दिली़ एचआयव्हीबाधित म्हणून पहिला विवाह झालेले विजय भेंडे यांनी एचआयव्हीने बाधित यापूर्वीच्या जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाची माहिती दिली़ यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार मंत्रोच्चारांच्या गजरात पाच जोडपी विवाहबद्ध झाली़ त्यांच्यावर अक्षता टाकून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला़ प्रसंगी यापूर्वी विवाहबद्ध झालेल्या एचआयव्हीबाधित दाम्पत्यांनीही येथे हजेरी लावली़ एड्सबाधितांसाठी काम करणा:या संघटनांच्या कार्यकत्र्यानी येथे जनजागृती केली़ दरम्यान या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते हैदर नूरानी व पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना मानवता पुरस्कार देऊन गौरवण्यात आल़े तसेच विवाह सोहळ्याला मदत करणा:या दानशूरांचा गौरव करण्यात आला़ यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहादा पोलीस स्टेशन ठाणे, म्हसावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतल़े
पाच एचआयव्हीबाधित जोडप्यांचा ‘गृहस्थाश्रमात’ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 12:05 PM