शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

पाच लाखाचे अवैध लाकूड जप्त : तळोद्यातील चिनोदा चौफुलीवर पकडला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लाकडाची चोरटी वाहतूक करणा:या वाहनांचा  येथील वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून चिनोदा चौफुली नजिक पकडले. या ट्रकबरोबरच त्यातील पाच लाखाचे लाकूड जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी केली. वनविभागाच्या या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत वृत्त असे की, लाकडाने भरलेला ट्रक क्रमांक एच आर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लाकडाची चोरटी वाहतूक करणा:या वाहनांचा  येथील वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून चिनोदा चौफुली नजिक पकडले. या ट्रकबरोबरच त्यातील पाच लाखाचे लाकूड जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी केली. वनविभागाच्या या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत वृत्त असे की, लाकडाने भरलेला ट्रक क्रमांक एच आर 57 - ए 2645 हा पहाटे पाच वाजेच्या सुमारास अक्कलकुव्याहून निघाल्याची खबर अक्कलकुवा व तळोदा वनविभागाच्या पथकास मिळाली होती. या पाश्र्वभूमिवर अक्कलकुवा येथील पथकाने या वाहनाचा पाठलाग थेट केला होता. ही खबर तळोद्याच्या पथकास देण्यात आली होती. या पथकाने सापळा रचून शहरापासून जवळ असलेल्या वळण रस्त्यावरील चिनोदा चौफुलीवर  ट्रक पकडला. या वेळी वनविभागाच्या कर्मचा:यांनी ट्रकची झाडा झडती घेतल्यानंतर त्यात खैर व गंडोरी जातीचे लाकडे आढळून आली. हा ट्रक वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर येथील उपवनसंरक्षक कार्यालयात आणला. याठिकाणी लाकडचा पंचनामा करण्यात आल्यानंतर साधारण 21.730 घटमीटर लाकूड मिळून आले. या मालाची किंमत पाच लाख व वाहनाचे 10 लाख असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला             आहे. वाहन पकडल्याबरोबर चालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे.  ही कारवाई उपवनसंरक्षक अनिल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, खापरचे वनक्षेत्रपाल ई.बी. चौधरी, वनपाल डी.डी. चौधरी,                     वनपाल एल.हच. सांगळे, वनरक्षक डी.के. सोनार, आर.एस. बैरागी, एम.बी. जाधव, एस.आर.देसले, एन.पी. पाटील यांच्या पथकाने  केली. पुढील तपास उपवनसंरक्षक अनिल थोरात करीत आहेत. दरम्यान लाकडाची चोरटी वाहतूक करणा:या तस्करांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.