लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : खैर जातीचे लाकूड भरून अक्कलकुवाकडे जाणारा ट्रक येथील वनउपज तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पकडून त्यातील पाच लाखाचे लाकूड व ट्रक वनविभागाने ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक (क्रमांक एम.एच.१८ एए -०११५) पांढरकवडा वनक्षेत्रातील उमरी वनहद्दीतून कोरेगाव येथून अंदाजे पाच लाखाचे खैर जातीचे लाकूड घेऊन परवान्यासह १४ जुलै रोजी निघाला होता. हा ट्रक १५ जुलै रोजी तळोदा येथील उपउपज तपासणी नाक्याजवळ आला असता तेथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना संशय आला. या अधिकाºयांनी पुढील चौकशी केल्यानंतर ट्रकसह पाच लाखाचे खैर जातीचे लाकूड जमा केले. वाहन चालक नशीब अलीखॉ (रा.रिसोड, जि.वाशिम) याच्याविरोधात वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परवाना संशयास्पदकोरेगाव येथून ट्रकमध्ये आणलेल्या लाकडाचा परवाना काढलेला असल्याचे ट्रक चालकाने सांगितले असले तरी जेव्हा त्याची चौकशी वनविभागाच्या अधिकाºयांनी केली तेव्हा त्यात संशय आला आहे. त्याबाबत पांढरकवडा येथील वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून येथील अधिकारी माहिती घेत असल्याचे प्रभारी वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार यांनी सांगितले. लाकडाने भरलेला हा ट्रक सध्या वनविभागाच्या कार्यालयात असून लाकडाचे मोजमापदेखील केले जात आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक सुरेश केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार हे करीत आहेत. दरम्यान, तळोदा वनविभागाच्या या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाच लाखाचे खैर जातीचे लाकूड व ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:38 PM