लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे मजूरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांनी पायीच घराचा रस्ता धरला होता़ गुजरातसह जिल्ह्याच्या विविध भागातून निघालेल्या या मजूरांची प्रशासनाने नऊ ठिकाणी निर्माण केलेल्या शेल्टर होममध्ये व्यवस्था केली आहे़ यातील केवळ तीन ठिकाणी सध्या १६३ मजूरांची व्यवस्था करण्यात आली असून २६ मजूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणाहून आले होते तेथेच परत गेले आहेत़कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे़ यातून उद्योगधंदे बंद पडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात आलेले तसेच गुजरात राज्यात असलेले कामगार गावाकडे पायीच निघाले होते़ या कामगारांना अपाय होवू नये यासाठी प्रशासनाने त्यांची तातडीने दखल घेत ९ ठिकाणी व्यवस्था करुन राहण्याची व्यवस्था केली होती़ यातून खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि परराज्यातील मजूर येथे गेल्या १५ दिवसांपासून थांबून आहे़ तहसीलदारांच्या निगराणीत या स्थलांतरीतांना सेवाभावींच्या मदतीने अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे़ स्थलांतरीतांना अडचणी येऊ नयेत यासाठी तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालयातील कर्मचारी, ग्रामसेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ विशेष बाब जिल्ह्याच्या विविध भागातून गावाकडे जाणारे २९ जण आपल्या कामाच्या ठिकाणी परत गेले असून त्याठिकाणी त्यांना काम देणाऱ्यांनी त्यांची पुन्हा सोय केली आहे़दुसरीकडे आरोग्य विभागामार्फत दर एक दिवसाआड आरोग्य विभागाचे प्रत्येकी एक पथक पायी चालून आलेल्यांची तपासणी करत असून आरोग्य सेवकांकडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे़ लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत पाठवण्यात येणार असून तत्पूर्वी अक्कलकुवा, नवापुर आणि शहादा येथील छावणीत दर दिवशी सेवाभावी नागरिक आणि संस्थांचे पदाधिकारी भेट देत अन्नपुरवठ्यासह इतर वस्तूंचे वाटप करत आहेत़४एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व ९ पैकी केवळ शहादा तालुक्यातील ३, अक्कलकुवा व नवापुर येथील प्रत्येकी एका शेल्टर होममध्ये एकूण १८९ जण थांबून होते़ यातील २९ जण हे जिल्ह्यातूनच स्थलांतरीत होते़ ते काही दिवसांपूर्वीच घराकडे परत गेले असून काहींची व्यवस्था जिल्ह्यातच झाली आहे़ यामुळे आता खापर ता़ अक्कलकुवा येथे ८०, म्हसावद ता़ शहादा येथे पाटील फार्म हाऊसमध्ये १०, शहादा येथे १० तर प्रकाशा येथील सद्गुरु धर्मशाळेत १९ असे ४९ जण थांबून आहेत़ नवापुर येथील शेल्टरहोमध्ये गुजरात राज्यातून पायी चालून आलेले ३४ जण थांबवले असल्याची माहिती आहे़४प्रकाशा येथील धर्मशाळेत इंदौर येथील सात जण आणि तसेच पश्चिम बंगाल कडे परत जाणाºयांनाही आसरा देण्यात आला आहे़ त्यांच्यात निराशा बळावत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यावर शहाद्याचे तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी भर दिला होता़४९ ठिकाणी असलेल्या शेल्टर होममध्ये तूर्तास सामाजिक संस्था मदत करत असल्या तरी सोय न झाल्यास शिवभोजन केंद्रातून पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे़ परंतू अद्याप एकाही केंंद्रावर तशी वेळ आलेली नाही़ सर्वच ठिकाणी नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत़नंदुरबार शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १ आणि ४ या दोन ठिकाणी तळोदा शहरात प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील मुलींचे वसतीगृह, खापर ता़ अक्कलकुवा येथील आदिवासी मुलींचे वसतीगृह, नवापुर येथील आरटी चेक पोस्ट, सुरवाणी ता़ धडगाव येथील आदिवासी मुलांचे वसतीगृह, म्हसावद येथे पाटील फार्म हाऊस, शहादा येथील म्युन्सिपाल्टी स्कूल आणि प्रकाशा ता़ शहादा येथील सद्गुरु धर्मशाळा येथे स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़खापर येथे संख्या वाढल्यानंतर स्थलांतरीतांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने नवोदय विद्यालयाचे एक वसतीगृह सज्ज ठेवले आहे़खापर येथे मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेवणाची सोय करुन दिली आहे़ अक्कलकुवा तालुक्यातील पाच सेवाभावी संस्था तसेच स्थानिक लोक प्रतिनिधी हे सातत्याने दोन वेळेचे जेवण देत असल्याची माहिती देण्यात आली आहे़सेवाभावी संस्था सध्या मदत करण्यासाठी पुढे येत आहेत़ त्यातून स्थलांतरींना आधार मिळाला आहे़ प्रशासनानेही पर्यायी व्यवस्था करुन दिली आहे़ शहाद तालुक्यातील तिन्ही शेल्टर होममध्ये आरोग्य तपासणी, सॅनेटाझर यासह विविध वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे़ आरोग्य तपासणीही सुरु आहे़-डॉ़ मिलींद कुलकर्णी,तहसीलदार, शहादा़
सेवाभावींच्या मदतीतून स्थलांतरीतांना मिळतेय अन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:44 PM