लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती़ त्यांना तात्काळ बोरद व तेथून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े यातील दोघींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेल़े मंगळवारी सायंकाळी सात वाजता त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमातील विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होत़े यानंतर काही वेळात बालिकांना उलटय़ा आणि अतीसाराचा त्रास सुरु झाला होता़ प्रशासनाने तातडीने मुलींना बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत उपचार सुरु केले होत़े परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ रुग्णालयात करमीला रमेश पाडवी (14), शर्मिला लालसिंग वळवी (15), सपना सायसिंग पाडवी (15), प्रियंका हरीश्चंद्र वळवी (13), ज्योती शत्रुघA ठाकरे (15), अश्विनी अंबरसिंग मोते (15), अश्विनी कोरजी नाईक (15), निलिमा रामसिंग पाडवी (14), लिना रावल्या तडवी (10), निशा शिवाजी तडवी (11), लक्ष्मी पाडवी (14) या बालिकांवर उपचार सुरु होत़े याठिकाणी वैद्यकीय अधिक्षक डॉ़ विजय पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडून उपचार सुरु आहेत़ दरम्यान लिना तडवी आणि निशा तडवी या दोघींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े आश्रमशाळेच्या गृहप्रमुख निमा गावीत, शैला वसावे, शिक्षक विष्णू पाटील यांनी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले होत़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, तहसीलदार पंकज लोखंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून विद्यार्थिनींच्या प्रकृतीची पाहणी केली़
विद्यार्थिनींना पाणी किंवा जेवणातून विषबाधा झाली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिका:यांनी वर्तवला आह़े दरम्यान त:हावद येथे दोन दिवसापासून विज पुरवठा बंद होता़ यामुळे विद्यार्थिनी दोन दिवसांपासून हातपंपाचे पाणी पित असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आह़े यातूनच त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े ूउपजिल्हा रुग्णालयातील 9 आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही बालिकांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आह़े