लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा परिसरात नर व मादी बिबटय़ाने दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर वनविभागाची गस्त वाढविण्यात आली. त्यामुळे ही नर-मादी बिबटय़ाची जोडी कुठे, कोणत्या क्षेत्रात गेली असेल या भितीने रांझणी, रोझवा परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहे.बहुतांश ग्रामस्थांकडून आपापल्या पाळीव प्राण्यांना दावणावरच बांधून ठेवत चारापाणी करण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान बहुतांश शेतकरी बांधवांकडून शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच गायी, शेळीपालन हे व्यवसायही करण्यात येतात. त्यासाठी गुराखी तसेच रोजंदारीने गडी लावून त्यांना रानात चारावयास पाठवण्यात येते. परंतु बिबटे सक्रीय झाल्याची वार्ता सर्वत्र कानावर आल्याने ग्रामस्थांकडून सध्या तरी आपापली जनावरे घरीच ठेवण्यास प्राधान्य दिले असल्याचे चित्र आहे. तसेच काही शेतक:यांकडून पोळा सण अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आपापल्या बैलांची विशेष काळजी घेत असून, शेतातून हिरवा चारा कापून आणत बैल गोठय़ातच बांधायला प्राधान्य दिले आहे.परिसरातील ग्रामस्थांकडून रात्रीच्या वेळीही आपापले गोठे, शेड यांकडे लक्ष दिले जात आहे. तरी संबंधित विभागाने याबाबत गांभीर्याने घेऊन नर-मादी बिबटय़ाला जेरबंद करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
बिबटय़ामुळे वनविभागाची गस्त वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:27 PM