Manikrao Gavit : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन
By मनोज शेलार | Published: September 17, 2022 11:22 AM2022-09-17T11:22:23+5:302022-09-17T11:23:26+5:30
अंत्यसंस्कार रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या धुळीपाडा येथील शेतात करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईक भालचंद्र गावित यांनी दिली आहे.
नंदुरबार - माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी त्यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या धुळीपाडा येथील शेतात करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईक भालचंद्र गावित यांनी दिली आहे. त्यांचे पार्थिव नाशिकहून आज नवापूर येथे राहत्या घरी आणण्यात येणार आहे.
माणिकराव गावित यांच्या पश्चात एक मुलगा माजी जि.प.अध्यक्ष व विद्यमान सदस्य भरत गावित, तीन मुली माजी आमदार निर्मला गावित, प्रा. डाॅ. जयश्री गावित, निता गावित, सुन, जवाई, नातवंड, असा परिवार आहे.