लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मांडूळ या दुर्मिळ सापाची तस्करी करणा:या चौघांना पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत ताब्यात घेतल़े गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली़ मध्यप्रदेशातील चौघे मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी नंदुरबार शहरात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी रात्री वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे, उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप रणदिवे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह पोलीस व वन कर्मचा:यांचे पथक गुरूवारी पहाटेपासून सक्रीय झाले होत़े गस्त सुरू असताना तळोदा रस्त्यावरील गणपती नगरासमोरील दारूच्या दुकानाजवळ एमपी 09 बीसी 9771 हे चारचाकी वाहन दिसून आल़े याठिकाणी उपस्थित चौघांची गस्ती पथकाने चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यांच्या वाहनाची पथकाने झडती घेतली असता त्यातून मांडूळ जातीचा जिवंत सर्प आढळून आला़ चौघांना पथकाने तातडीने ताब्यात घेत अटक केली़ जुनैद जब्बार शेख, रामनिवास रामेश्वर दयाल, फिरोज सरदार पटेल व किशोर चंपालाल चव्हाण अशी चौघांची नावे आहेत़ त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, भारतीय वन अधिनियम कलमांतर्गत वनगुन्हा नोंद आह़े तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी करत आहेत़ पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्यवहारे, वनपाल प्रभाकर नगराळे, संजय पाटील, अरविंद निकम, कल्पेश अहिरे, ममता पाटील, भानुदास वाघ यांचाही समावेश होता़
मांडूळची अवैैध तस्करी करणा:या चौघांना नंदुरबारात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:49 PM