लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : फेस ता़ शहादा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत चार लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी समिती अध्यक्ष व सचिव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 12 वर्षापासून ही पाणी योजना प्रलंबित आह़े शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत फेस ग्रामपंचायतीने 12 वर्षापूर्वी सहभाग नोंदवत शहादा पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता़ ग्रामपंचायतीने गठीत केलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी ओंकार जगन्नाथ चौधरी यांची तर सचिवपदावर दिलीप रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती़ पंचायत समितीकडून समितीसाठी 4 लाख 29 हजार 931 रूपयांचा निधी जलकुंभ उभारणीसाठी देण्यात आला होता़ परंतू अध्यक्ष आणि सचिव या दोघांनी प्रस्तावित असलेला 4 लाख 27 हजार 892 रूपयांच्या निधीचा गैरवापर केला होता़ पंचायत समितीकडून याप्रकरणी समितीचे गठन करण्यात आली होती़ चौकशी दरम्यान ओंकार चौधरी आणि दिलीप पाटील दोघे रा़ शहादा यांना वारंवार बोलावून कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी दस्तावेज दाखल केले नव्हत़े शहादा पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता गुलाब जगन्नाथ मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार चौधरी व दिलीप पाटील यांच्याविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े फेस येथील राहुल कोळी यांनी जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर 14 ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलन सुरू केले होत़े प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांनी 27 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होत़े त्याची दखल घेत जिल्हाअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होत़े
फेस गावच्या पाणी योजनेत चार लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:47 PM