लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 23 : शहादा-लोणखेडा बायपास रस्त्याजवळ असलेले युनीयन बँकेचे एटीएम फोडून सुमारे चार लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली़पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा-लोणखेडा बायपास रस्त्यावर युनीयन बँकेची इमारत आह़े इमारती खालीच बँकेचे एटीएम ठेवण्यात आले आह़े गुरुवारी मध्यरात्री दोन ते चारच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी गॅसकटरच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातून साधारणत चार लाखांची रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आह़े परिसरात सुतगिरणी कामगार वसाहत व हॉटेल असल्याने रात्री 1 वाजेर्पयत हा परिसर गजबजलेला असतो़ त्यामुळे ही चोरी दोन ते चार वाजेच्याच दरम्यान झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आह़े घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी एम़पी़ पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगूजर यांनी श्वान पथकासह घटनास्थळी हजेरी लावली़ तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलविण्यात आले होत़े सकाळी श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरार्पयत मार्ग दाखविला परंतु उपयोग झाला नाही़
लोणखेडय़ात युनीयन बँकेचे एटीएम फोडून चार लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:03 PM