शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

मोलगी रस्ता दुरुस्तीला लागणार चार महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी दरम्यानचा रस्ता संततधार पावसामुळे पूर्णपणे खचला असून हा रस्ता नव्याने तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी दरम्यानचा रस्ता संततधार पावसामुळे पूर्णपणे खचला असून हा रस्ता नव्याने तयार होण्यास किमान चार महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आह़े तोवर मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे नियोजन आह़े अतीवृष्टीमुळे सातपुडय़ातील दुर्गम भागाला जोडणा:या मोलगी-डाब -अक्कलकुवा रस्त्यावर जागोजागी दरडी तसेच डोंगरातून येणा:या पाण्यामुळे आठ पूल कोसळले आहेत़ यातून या मार्गावर वाहतूक होणेच शक्य नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून वाहतूक बंद आह़े देवगोई घाटात तीन स्लॅब ड्रेनेज पूर्णपणे कोसळल्याने मोठे भगदाड पडले आह़े मोलगी बाजूने सुरु असलेल्या रस्त्यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती आह़े परंतू दरडींचा आकार हा मोठा असल्याने दरड उचचल्यानंतर रस्ता अधिक खचण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े देवगोई घाटातील तब्बल तीन किलोमीटरचे अंतर पूर्णपणे निकामी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याला केंद्रशासनाच्या विशेष प्रकल्पांतर्गत 60 कोटी रुपयांचा निधी मिळाला आह़े परंतू त्याचे काम मात्र पावसामुळे पुढे ढकलण्यात आले होत़े लोकसभा निवडणूकांपूर्वी मिळालेला निधी वेळेत खर्च झाला असता, तर रस्ता सुस्थितीत राहिला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आह़े बांधकाम विभागाने रस्त्याचे तात्पुरते काम करुन दिल्यास ते पुन्हा कोसळण्याचे भिती असल्याने रस्ता चार महिने बंद राहण्याची शक्यता आह़े रस्ता बंद असल्याने मोलगीकडे जाणारी वाहने देवमोगरा मार्गाने जात आहेत़ तसेच अक्कलकुवा ते मोलगी वाहतूक तळोदा धडगाव मार्गानेही होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े दुर्गम भागात नुकसान तालुक्यातील जामली व बोखाडी परिसरातून वाहणा:या देवनदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेत जमिनीसह पिके वाहून गेल्याची माहिती देण्यात येत आह़े  या नुकसानीचे तातडीने  पंचनामे करण्यात यावे अशी मागणी भांग्रापाणीच्या सरपंच इमाबाई भगतसिंग तडवी, उपसरपंच तुकाराम देहल्या वसावे, भरतसिंग आरशी तडवी, दाज्या नाहन्या तडवी, जलसिंग खाअल्या तडवी, आरशी रेवला तडवी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतक:यांनी अक्कलकुवा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अककलकुवा-मोलगी रस्त्यावर आमलीबारी ते देवगोई घाटाच्या दरम्यान दोनगुलर येथील पुलासह सात पूल वाहून गेली आह़े रस्त्यावर जागोजागी दरड आणि गाळाचे ढिग आहेत़ पुराच्या पाण्यात रस्त्यावर झाडे वाहून आली आहेत़  बंद पडलेल्या रस्त्यावर डाब देवगोई ते आमलीबारी असा पायी प्रवास नागरिक करत आहेत़ आमलीबारी येथून वाहनाने ते अक्कलकुवा गाठत आहेत़ धडगाव किंवा देवमोगरा मार्गाने जाणे परवडणारे नसल्याने आदिवासींना नाईलाजास्तव पायी चालावे लागत आह़े दोनगुलर  केटाघाट जवळ वाहून गेलेल्या पुलांवरुन अद्यापही पाणी वाहत असल्याने त्यातून मार्ग काढत नागरिक पायी चालत येत असल्याने दुर्घटनेची शक्यता आह़े