शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वनविभाग परत करणार बारी येथील चौघांचे जप्त केलेले लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वन विभागाच्या काल झालेल्या संयुक्त कारवाईत अवैध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वन विभागाच्या काल झालेल्या संयुक्त कारवाईत अवैध लाकुड, तयार फर्निचर आणि चार रंधा मशीन असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता़ कारवाईदरम्यान चार ग्रामस्थांचे घराचे जुने लाकूडही जप्त केले गेल्याने दोन्ही राज्याच्या वन विभागाकडून ते परत करण्याचा निर्णय घेतला गेला आह़े सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, गुजरातचे डांग व तापी डिव्हिजनचे उप वनसंरक्षक विवेक तोडकर, सहाय्यक वनसंरक्षक जिगर अमीन, सहाय्यक वनसंरक्षक गोविंद सुरया, उच्छल वनक्षेत्रपाल उपेंद्र राऊलजी, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल आऱबी़पवार, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक  शिवाजी नागवे यांच्यासह नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा व गुजरात राज्य राखीव दल व वनविभागाच्या 500 कर्मचा:यांनी गुरुवारी नवापुर तालुक्यातील बारी गावात  संशयित घरांची झडती घेऊन ताज्या व अवैध तोडीचे खैर, शिसम व सागाचे साठवून ठेवलेले लाकूड, तयार बेड व सोफासेट व चार रंधा मशिन जप्त केले होते. दोन ट्रक, एक टेम्पो, तीन जीप भरुन लाकुड काढण्यात आल्याने जप्त मालाची मोजदाद होऊ शकली नव्हती़ उच्छल वनक्षेत्रात मालाची गुरुवारी मोजदाद करण्यात आली होती़ सकाळी 9 वाजेपासून 50 कर्मचा:यांनी मालाची मोजदाद सायंकाळी 5 वाजता पूर्ण केली. कारवाईत 2 लाख रुपये किमतीचे चार रंधा मशीन, 1 लाखाचे बेड व सोफासेट हे तयार फर्निचर व शासकीय दराने पावणेसात लाख रुपयांचे 14 घनमीटर 635 नग लाकूछ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ बाजार भावाप्रमाणे लाकडाची किंमत 12 लाखाच्या जवळपास आह़े बारी गावातून जप्त केलेल्या मालाची आवक गुजरात राज्यातूनच झाली असल्याचा अंदाज आहे. जप्त मालाची समसमान वाटणी  करण्यात येणार किंवा कसे या बाबत दोन्ही राज्यातील वरिष्ठ अधिका:यांची बैठक लवकरच  आयोजित करून धोरणात्मक निर्णय होणार आहे. दरम्यान, सहाय्यक वन संरक्षक गणेश रणदिवे यांनी नंदुरबार उपवन संरक्षक सुरेश केवटे व मुख्य वनसंरक्षक धुळे यांना कारवाईचा अहवाल शुक्रवारी सादर केला. यापुढेही अशाच प्रकारे संयुक्त कारवाई होणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितल़े दरम्यान, चार जणांचे घरकूल योजनेचे काम सुरु असल्याने त्यांच्या घरांचे छप्परचे व चारही बाजुंचे लाकुड काढून ठेवण्यात आले होत़े हे लाकूड 40 ते 50 वर्ष जुने आह़े या कारवाईत ते लाकूडही जप्त करण्यात आले होत़े संबंधितांनी वन विभागात संपर्क करुन याविषयी सत्यता पटवून देण्याचा प्रय} केला होता़ वन विभागाने शहनिशा करुन चौघांचेही लाकूड परत करण्याचा निर्णय घेतला आह़े वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी गुजरात वनविभागास या संबंधी पत्रव्यवहार केला असून संमती घेण्याचा प्रय} चालविला आहे. लवकरच संबंधिताना त्यांचे लाकुड मिळेल असे हाडपे यांनी सांगितल़े हे करतांना ताज्या तोडीच्या लाकडाबाबत खबरदारीदेखील घेतली जात आहे.