नंदुरबार : विरोधकांनी विकास कामे होत नसतील तर विरोध करावा केवळ विरोधाला विरोध करू नये, नंदुरबार शहरातील जनतेला आश्वासित केल्यानंतर येत्या चार वर्षात 1 रूपयाही घरपट्टी वाढ होणार नाही अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली़ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवकांकडून विविध विषयांच्या मंजूरीवेळी झालेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर आमदार रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेत विकास कामांची माहिती दिली़ यावेळी आमदार रघुवंशी यांनी सांगितले की, सर्वसाधारण सभेत मांडलेले सर्व विषय हे विकासाचे होत़े त्यावर चर्चा झाली पाहिजे होती़ पण भाजपा नगरसेवक त्याला विरोध केल्याने खेद होत आह़े विरोध करणा:यांच्या प्रभागातच अडीच ते तीन कोटी रूपयांची कामे मंजूर केली आहेत़ सर्वच प्रभागांमध्ये विकासकामे करण्यात येतील, भेदभाव अजिबात होणार नाही. मालमत्ताधारकांनी लवकर कर भरावा म्हणून मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय पालिकेच्या सभेत झालेला आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसा शिल्लक नसतानाही ठेकेदारांना 50 टक्के देयके अदा केली आहेत. पालिकेत 7 अभियंत्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या दोन अभियंते कार्यरत आहेत. त्यामुळे कामांन अडचणी येत आहेत रिक्त पदांबाबत शासनाला अवगत करण्यात येणार आह़े
घरपट्टी वाढीपासून नंदुरबारकरांना चार वर्षे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:08 PM