रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी-पाडळपूर रस्त्यावरील फरशीपुल गेल्या तीन वर्षापूर्वी वाहुन गेला होता़ त्यानंतर प्रशासनाकडे वारंवार पुलाबाबत मागणी करण्यात आली़ पुलाअभावी दळणवळण सेवांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून चौथ्यांदा वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी भराव टाकून हा रस्ता वाहतुकयोग्य केला आह़ेतीन वर्षापूर्वी पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुरामध्ये रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले आह़े यातच रांझणी-पाडळपूर रस्त्यावरील फरशीपुलही वाहून गेला होता़ परंतु तीन वर्ष लोटली गेल्यावरही यावर प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही़ त्यामुळे परिणामी परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े सध्या उसतोड, पपई, केळी काढणी सुरु आह़े यामुळे आपली शेतीमालाची वाहने कशी काढावी असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े शिवाय या मार्गावरुन वाहन नेल्यास शेतमालाचे व वाहनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही होत आह़े त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतक:यांकडून स्वखर्चाने भराव टाकून रस्ता काही प्रमानात वाहतुकीस योग्य बनविण्यात आला आह़े दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतक:यांना आपापल्या रस्त्यावर भराव व डागडूज्जी केली असून आपली शेतीमालाची वाहने व्यवस्थित निघतील अशी व्यवस्था करुन घेतली आह़े परंतु पावसाळ्यात शेतीशिवारात वावर करावा कसा? असा प्रश्नही शेतक:यांकडून उपस्थित करण्यात येत आह़े रस्त्याच्या भरावासाठी शेतक:यांकडून लोकसहभागातून पैसा गोळा करण्यात आला होता़ वाहुन गेलेल्या फरशी पुलावर भराव टाकण्याची ही चौथी वेळ आह़े या फरशी पुलावर दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य वेस्तादादा पावरा यांनी तर एक वेळा शेतक:यांकडून स्वखर्चाने भराव टाकण्यात आला आह़े
‘त्या’ फरशीपुलावर चौथ्यांदा भराव : रांझणी-पाडळपूर रस्त्याची कैफियत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:04 PM