शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

योजनेचे भवितव्य पाणीसाठय़ावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:45 AM

24 तास पाणीपुरवठा : योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर

नंदुरबार : शहराला 24 तास पाणी पुरवठा करणा:या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. सद्य स्थितीत पालिकेने तयार केलेला अहवाल जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीसाठी गेला आहे. योजना मंजुर झाली तरी यंदा ती कार्यान्वीत होणार नाही हे स्पष्टच आहे. आधीच विरचक प्रकल्पात अवघा 38 टक्के पाणीसाठा आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याच्या शक्यतेमुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची जाणवणार आहे. परिणामी योजना राबविण्यास अडचणी येतील.नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षीत केला जातो. प्रकल्प किमान 60 टक्के भरला तरी वर्षभर शहराला दोनवेळा नियमित पाणीपुरवठा होईल एवढी त्याची क्षमता आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून अपु:या पजर्न्यमानामुळे हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कधीही भरला नाही. यंदा देखील प्रकल्पात पुर्ण पावसाळ्यात केवळ 20 टक्के पाणीसाठय़ात वाढ झाली. आधीचा 22 टक्के व नव्याने भर पडलेल्या 20 टक्के साठय़ानुसार 42 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी चार टक्यांनी घट होऊन साठा 38 टक्यांवर आला आहे. येत्या काळात आणखी घट होण्याचे प्रमाण पहाता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.24 तास पाणीपुरवठाची योजनापालिकेने शिरपूर नगरपालिकेच्या धर्तीवर 24 तास पाणी पुरवठय़ाची योजना आखली आहे. आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास पाणी अर्थात 24 बाय 7 असे या योजनेचे नाव आहे. यासाठी मात्र, प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला मिटर बसविण्यात येणार आहे. या योजनेचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाकडे आता तांत्रीक मंजुरीसाठी ती पाठविण्यात आली आहे. या योजनेसाठी काही ठिकाणी नवीन पाईपलाईन तर काही ठिकाणी जलकुंभ उभारून झोन तयार करावे लागणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे.पाणीसाठय़ाची गरजही योजना राबविण्यासाठी विरचक प्रकल्पात दरवर्षी पावसाळ्यात किमान 50 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होणे आवश्यक आहे. तरच 24 तास नळांना पाणी राहू शकते. गेल्या काही वर्षातील पावसाळा आणि एकुणच प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता अपवादात्मक स्थितीत प्रकल्पातील पाणीसाठा 50 टक्केपेक्षा अधीक गेला आहे. त्यामुळे योजनेचे भवितव्य संपुर्णपणे या प्रकल्पातील पाणीसाठय़ावरच राहणार आहे. त्यामुळे विरचकसह आंबेबारा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. पाणीसाठा आरक्षीतयंदा पालिकेने विरचकसह आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा आरक्षीत केला आहे. आंबेबारा प्रकल्पही यंदा 70 टक्केच भरला होता. सद्य स्थितीत आंबेबारा प्रकल्पातही 55 ते 60 टक्के पाणीसाठा आहे. आंबेबारा धरणातून शिवणनदीतील चारीद्वारे पाणी आष्टे येथील पंपींग स्टेशनर्पयत आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठवून ते शहरात पुरविले जाते. शहरातील उंचावरील भागात नळांना पाणी येण्याचे प्रमाण कमी आहे. 40 ते 50 मिनिटांच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेत अवघा दहा ते 15 मिनिटे अशा भागात पाणीपुरवठा होतो. त्यात प्रामुख्याने ज्ञानदीप सोसायटीचा उंचावरील भाग, वाघेश्वरी टेकडीच्या उंचावरील भाग, संजय नगरचा काही भाग यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा भागात पालिकेने पर्यायी उपाययोजना करून पुरेसा पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागांमधील नागरिकांमधून होत आहे.