रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबडोदा येथील गंगानाथ विद्यालय हे क्रांतीकारकांचा अड्डा होता. त्याच ठिकाणी आचार्य काकासाहेब कालेलकर यांचेही कार्य सुरू होते. परंतु म.गांधी यांच्या ते संपर्कात आले आणि अहिंसेच्या मार्गावर या आंदोलनात सहभागी झाले. काकासाहेबांसोबत देशभर प्रवास करता आला. काकासाहेबांनीच स्थापन केलेल्या गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेचे काम दिल्ली येथील राजघाटावर आपण 50 वर्षापासून सांभाळत असून त्यातून आपल्या आयुष्याला वेगळीच झळाळी मिळाल्याची भावना या सभेच्या अध्यक्षा कुसुमबेन शहा यांनी व्यक्त केली. प्रश्न : गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेची वाटचाल कशी सुरू आहे?उत्तर : आचार्य काकासाहेब कालेलकर यांनी 1942 मध्ये सुरुवातीला हिंदुस्थानी प्रचार सभा अशी संस्था स्थापन केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या सभेसाठी पंडित नेहरू यांनी राजघाटावर गांधींच्या समाधीच्या परिसरात संस्थेला जागा दिली आणि तेथेच या संस्थेचे काम आजवर सुरू आहे. पुढे हीच संस्था गांधी हिंदुस्थानी साहित्य सभा म्हणून नावारुपास आली. या संस्थेतर्फे कला, साहित्य क्षेत्रातील काम व्यापक स्तरावर सुरू आहे. गांधींनी खेडय़ाकडे चला असे म्हटले होते. त्याच मार्गावर ग्रामिण भागात गांधी विचार पोहचविण्यासाठी प्रय} सुरू आहेत. संस्थेतर्फे विचार प्रसारासाठी 26 जानेवारी 1950 पासून मंगलप्रभात हे मासिकही सुरू आहे. प्रश्न : संस्थेतर्फे सध्या कुठले उपक्रम राबविले जात आहेत? उत्तर : संस्थेच्या दिल्ली कार्यालयात रोज सकाळी सात वाजता गांधी विचार प्रार्थनेपासून दिवसाला सुरुवात होते. ती रात्री नऊ वाजेर्पयत विविध कार्यक्रमांनी सुरू असते. विशेषत: शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण, महिलांना स्वावलंबनासाठी शिलाई मशीनचे प्रशिक्षण, चरखा सेवा, संगीत वर्ग, निसर्गोपचारबाबत मार्गदर्शन यासह अनेक कार्यक्रम सुरू आहेत. ‘बापूने कहा था’ हे नाटक गावागावार्पयत नेण्यासाठी प्रय} सुरू आहेत.
नंदुरबारलाही केंद्र सुरूआपण 30 वर्षापूर्वी नंदुरबारात एका विवाह सोहळ्याला आली होती. त्यावेळी या भागातील लोकांशी भेटल्यानंतर येथेही सहयोग लाभल्याने आचार्य काकासाहेब कालेलकर केंद्र सुरू आहे. या ठिकाणीही नित्यनियमाने चरखा सेवा याच्यासह महिलांसाठी, बालकांसाठी विविध उपक्रम सुरू असून ते सामाजिक अंगाने परिणामकारक ठरत आहे.
चार राज्यात संस्थेचे केंद्रदिल्लीसह राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्र या संस्थेचे केंद्र सुरू आहेत. विशेषत: राजस्थानमध्ये बडगाव (बुंदी) येथे जलसंधारण क्षेत्रातील व्यापक स्वरूपाचे काम उभे झाले आहे. कर्नाटकमध्येही बेळगाव जवळ काकासाहेब शिक्षण निधी नावाने काम सुरू आहे. म.गांधी यांचे विचार गावागावात आणि घराघरार्पयत पोहचविण्यासाठी संस्थेचे प्रय} सुरू असल्याचे कुसूमबेन शहा यांनी सांगितले.