धडगाव : जल, जंगल व जमीन यावर आदिवासींचा निसर्गदत्त अधिकार असल्याने ते वाचविण्यासोबतच प्राकृती संरक्षण व आदिवासी विस्थापन विरोधात लढाई लढण्यास सज्ज व्हावे असा सूर येथे उमटला़ निमित्त होते आदिवासी एकता परिषदेच्या सांस्कृतिक एकता मेळाव्याच़े धडगाव येथील पंचायत समिती आवारात झालेल्या भव्य आदिवासी एकता सांस्कृतिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सदस्य करमसिंग पाडवी होत़े तर प्रमुख अतिथी म्हणून गुजरातचे जेष्ठ आदिवासी विचारवंत सांगल्या वळवी, आदिवासी एकता परिषदेचे मध्यप्रदेश प्रदेशाध्याक्ष गजानन ब्राम्हणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगर बागूल, पोरलाल खरते, माजी जिल्हा परिषद सभापती जामसिंग पराडके, गुजरातचे अॅड़ एल़एम़ पाडवी, निवृत्त अभियंता ङोलसिंग पावरा, आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सदस्य दामू ठाकरे, चंद्रसिंग बर्डे, धुळ्याचे डॉ़ महेश मोरे, जळगाव येथील सुनील गायकवाड, मोलगीचे अॅड़ कैलास वसावे, सुनीता पवार, फेंदा पावरा, पंचायत समिती सदस्य देवजी वळवी, बाबा वळवी, आऱसी़ वसावे, सुरेश वळवी, मनोज पावरा, शंकर पावरा आदी उपस्थित होत़े सांगल्या वळवी यांनी जल, जंगल व जमिनीशी आदिवासी बांधवांचे अतुट नाते असल्याचे सांगितल़े त्यामुळे प्राकृती सुरक्षेसाठी आदिवासींनी सज्ज झाले पाहिज़े गजानन ब्राम्हणे म्हणाले की, पाचवी व सहावी अनुसूचिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी आता मोठी लढाई लढण्यास तयार राहिले पाहिज़े अॅड़ एल़एम़ पाडवी यांनी पेसा कायदा व वन विधेयक विषयावर मार्गदर्शन केल़े या वेळी अॅड़ कैलास वसावे, सी़क़े पाडवी, डॉ़ महेश मोरे यांनी मनोगत व्यक्त केल़े कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव मुंगवारी यांनी तर सूत्रसंचालन राजू पावरा, क़ेक़े पावरा, तुकाराम पावरा, सुकदेव पावरा यांनी केल़े आभार सुनील पावरा व राकेश पावरा यांनी मानल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी शैलेश पावरा, लालसिंग भंडारी, अॅड़ शंकर वळवी, धिरसिंग वळवी, भाईदास पावरा, सुकलाल पावरा आदींसह आदिवासी एकता परिषदेच सदस्यांनी परिश्रम घेतल़े
जल, जंगल व जमीन रक्षणासाठी सज्ज व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:53 PM