लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : यंदाच्या तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर तळोदा तालुक्यातील तळवे व आमलाड परिसरातील नदी-नाल्यांवर लोकसहभागातून व लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली होती. त्यामुळे सध्या तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने नदीत खोदलेले खड्डे आणि बांधावर प्रचंड पाणी साचत आहे. आपण केलेल्या मेहनतीचे फळ पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, आमलाड व तळवे येथील ग्रामस्थांनी नदीत साचलेल्या पाण्याचे जलपूजन केले.यंदाच्या भीषण दुष्काळाचे चटके शेतक:यांपासून तर सामान्यांर्पयत सर्वानाच बसले होते. साहजिकच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतक:यांचे कृषीपंप निकामी ठरले होते. खालावलेली भूगर्भातील पाणी पातळी उंचावण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्याचा निर्धार तळोदा तालुक्यातील तळवे व आमलाड येथील तरुण शेतक:यांनी घेतला होता. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन मे महिन्याच्या अखेरीस ही कामे करण्यात आली. या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील नदी-नाल्यांवर लोकसहभाग व लोकवर्गणीतून 10 बाय 25 आकाराचे दोधाळ व लेंडी नाल्यात दोन ते अडीच किलोमीटर्पयत खड्डे केले. त्यामुळे सध्या तळोदा तालुक्यात दररोज होत असलेल्या जोरदार पावसामुळे हे खड्डे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. आपण मेहनतीने केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे गावक:यांच्या चेह:यावर हास्य फुलले आहे. नदी-नाल्यांमध्ये साचलेल्या या समाधानकारक पाण्याचे जलपूजन तळवे व आमलाड येथील ग्रामस्थांनी केले आहे. हे जलपूजन ब्राrाणपुरी येथील अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलीस पाटील भरत पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी उपसरपंच गोपाळ पाटील, पंकज पाटील, सतीश पाटील, राजू पाटील, अनिल रतिलाल पाटील, ईश्वर पाटील, भवान पाटील, नीलेश पाटील, शरद पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकांच्या श्रमाला मिळाली पाण्याची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:29 PM