लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : शाळा सुटल्यानंतर घरी परतणा:या पाचवीच्या विद्यार्थिनीची छेड काढून दोघांनी तिच्या गळ्यातील स्कार्फ ओढत जखमी केल्याची घटना मोदलपाडा ता़ तळोदा येथे घडली़ स्कार्फचा फास लागल्याने विद्यार्थिनी अत्यवस्थ झाली़ तळोदा शहर आणि तालुका परिसरातील टारगटांचा प्रश्न घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आह़े मोदलपाडा येथील संत गुलाम महाराज शाळेची पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनी बुधवारी सकाळी 11 वाजता शाळेतून मैत्रीणीसोबत पायी शेलवाई येथे घराकडे जाण्यासाठी निघाली होती़ दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला थांबून असलेल्या विशाल मोहनसिंग वळवी व विलास कांतीलाल वळवी दोघे रा मोदलपाडा तिची छेड काढली होती़ यादरम्यान दोघांना घाबरुन विद्यार्थिनी पळत सुटल्या होत्या़ यात पिडित विद्यार्थिनीनेही सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला असता, दोघांपैकी एका तिच्या गळ्यातील स्कार्फ ओढल्याने गळ्याला फास लागून बालिका जमिनीवर कोळसली़ यातून तिच्या गळ्यावर तसेच डोक्याला गंभीर जखमा झाल्या़ पिडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांवर पोलीसांनी कारवाई केली आह़े घटना पाहणारे मनोहर विरसिंग पाडवी यांनी विशाल वळवी व विलास वळवी यांनी या दोघांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी त्यांनाही दमदाटी केली होती़ घटनेबाबत तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र जाधव करत आहेत़ दोन दिवस उलटल्यानंतर ही घटना उजेडात आल्यावर तळोदा व परिसरातील पालकांनी टारगटांच्या कृत्याचा निषेध केला होता़ गेल्या काही दिवसांपासून परिसरातील युवकांचा उच्छाद त्रासदायक ठरत आह़े
घडलेल्या घटनेनंतर शाळेच्या शिक्षकांसह मोदलपाडय़ातील पालकांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले होत़े अवघ्या पाचवीच्या विद्यार्थिनीवर गुदरलेल्या या प्रसंगामुळे टारगटांच्या विकृतीचा निषेध करण्यात येत होता़ तळोदा बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना ग्रामीण भागात समोर आलेल्या घटनेने पालकांनी नाराजी व्यक्त केली आह़े पोलीसांकडून दोघांवर कारवाई झाली असली तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आह़े