लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून तºहावद पुनवर्सन ता़ तळोदा येथे माहेरी जाणारी गर्भवती माता आमलाड ता़ तळोदा येथे कळा येऊन रस्त्यावरच अत्यवस्थ झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली़ रस्त्यालगत राहणाऱ्या महिलांना हे समजून आल्यानंतर त्यांनी धाव घेत मदतीची माया देऊन साड्यांच्या आधारे छाया केल्याने मातेने रस्त्यातच गोंडस कन्येला जन्म दिला़ यावरच न थांबता महिलांनी कन्या आणि माता या दोघांची दिवसभर सेवासुश्रुषा करुन माहेरी रवाना केले़तºहावद पुनर्वसन ता़ तळोदा येथील माहेर असलेल्या सेमीबाई रणजित वसावे ही २५ वर्षीय माता गुरुवारी सकाळी सिपाडा ता़ सागबारा जि़ नर्मदा येथून भावासोबत दुचाकीने तºहावद पुनर्वसन येथे निघाली होती़ पती रोजगारासाठी गुजरात राज्यात गेल्याने ९ महिन्याची गर्भवती असलेली सेमीबाई बाळंतपणासाठी माहेरी येत होती़ सोबत दोन मुलेही होती़ दुपारी बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावर आमलाड गावाजवळ पोहोचेपर्यंत पोटात कळा वाढत होत्या़ दरम्यान आमलाड गावातील पुलापासून पुढे आल्यानंतर पोट अधिक दुखू लागल्याने दुचाकी थांबवून त्या थेट रस्त्यातच पडल्या़ दरम्यान भावाने आरडाओरड केल्यानंतर परिसरात राहणाºया महिलांचे लक्ष गेले़ याच भागात राहणाºया आशा गटप्रवर्तक सुमनाबाई पावरा यांना महिलांनी बोलावून आणले़ रस्त्यात पडलेल्या सेमीबाईला अशा अवस्थेत उचलून नेणे शक्य नसल्याने महिलांनी घरुनच साड्या, गोधड्या आणून रस्त्यातच सावली करुन दिली़ यानंतर सुमनबाई ह्या दायी प्रशिक्षित असल्याने त्यांनी अत्यंत धाडसाने महिलेची प्रसूती करुन घेतली़रस्त्यात जन्मास आलेल्या गोंडस कन्येला पाहून सावली करुन चहूबाजूने उभ्या असलेल्या महिलांनाही भरुन आले होते़ तेथून गटप्रवर्तक सुमनबाई यांच्याच घरी माता आणि नवजात बालिका या दोघांची व्यवस्था करुन सायंकाळी महिलांच्या खर्चानेच दोघांना तºहावद पुनर्वसन येथे जुजबी साहित्य आणि बाळंतपणात लागणारा खाऊ देऊन रवाना करण्यात आले़
गर्भवती मातेला रस्त्यात दिल्याने छाया, जन्मास आली गोंडस काया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:50 AM