शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शासकीय शिक्षण सुविधांच्या ‘एक ना धड, भारभर चिंध्या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:20 PM

नंदुरबारात शिक्षणाच्या सुविधांसाठी नुसत्याच घोषणा केल्या जात आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज व आदिवासी कला व सांस्कृतिक केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली निवासी शाळा, एकलव्य इंग्रजी पब्लीक स्कूल यानंतर आता भर पडणार आहे केंद्रीय मणुष्यबळ विकास मंत्रालयाने घोषीत केलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजची. घोषणा होऊन काही शाळा सुरूही झाल्या आहेत, परंतु ...

नंदुरबारात शिक्षणाच्या सुविधांसाठी नुसत्याच घोषणा केल्या जात आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज व आदिवासी कला व सांस्कृतिक केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली निवासी शाळा, एकलव्य इंग्रजी पब्लीक स्कूल यानंतर आता भर पडणार आहे केंद्रीय मणुष्यबळ विकास मंत्रालयाने घोषीत केलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजची. घोषणा होऊन काही शाळा सुरूही झाल्या आहेत, परंतु त्यातील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा पहाता ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ अशी गत नंदुरबारातील या शासकीय शिक्षण संस्थाची झाली आहे.नंदुरबार जिल्हा दुर्गम व आदिवासी म्हणून शासकीय दप्तरी ओळखला जातो. मागास जिल्ह्यांच्या यादीत शेवटचा, मानव निर्देशांकात व दरडोई उत्पन्नात तळाचा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. शिक्षणाच्या सुविधा आणि दळणवळणाची साधणे गेल्या दशकापासून ब:यापैकी उपलब्ध होऊ लागली आहे. विकासाचा निर्देशांकही कासव गतीने का होईना पुढे सरकत आहे. त्यामुळेच केंद्र किंवा राज्याची कुठलीही योजना राहिली तर ती नंदुरबारपासून सुरुवात करण्याचा प्रघातच पडला आहे. आता त्यात शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व दिले जात आहे. त्यामुळेच राज्य शासनाने राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळला सुरु करण्याचा घेतलेला निर्णय दुरगामी ठरला. यापूर्वीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अर्थात तत्कालीन कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी नंदुरबारात मॉडेल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यापूर्वी आदिवासी विकास विभागाची एकलव्य इंग्रजी पब्लिक स्कूल सुरू करण्यात आली. मध्यंतरी वैद्यकीय महाविद्यालयाची दोनवेळा घोषणा झाली व दोन्ही वेळा ते रद्द झाले. आता नव्याने भर पडणार आहे ती केंद्रीय मणुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सुरू करण्यात येणा:या मॉडेल डिग्री कॉलेजची. नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात केवळ नंदुरबार आणि वाशिममध्येच हे कॉलेज मंजुर असून देशभरात 70 जिल्हा मुख्यालयात हे कॉलेज सुरू होणार आहे.या कॉलेजसाठी सुरुवातीला प्रत्येकी 12 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आता जागा उपलब्ध करून द्यावयाची आहे. मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह डिजीटल क्लासरूम, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि शैक्षणिक विभाग राहणार आहेत. पसंती आधारीत श्रेयांकन  अभ्यासक्रम, मुलभूत आणि कौशल्याधारीत ऐच्छिक अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. अद्याप या कॉलेजचे एकुण स्ट्रर कसे असेल, किती जागा उपलब्ध करावी लागेल यासह इतर बाबींसंदर्भात जिल्हा प्रशासनाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून काहीही सुचना मिळालेल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.शिक्षणाबाबतीत होणा:या या सुविधा जिल्ह्यातील युवकांना सोयीच्या ठरणार आहेत यात शंका नाही. परंतु केवळ स्ट्रर उभे करून उपयोग राहत नाही. त्यासाठी विद्याथ्र्यासाठीच्या भौतिक सुविधा, शिक्षकांची नियुक्ती, शिक्षणाचा दर्जा आदी बाबींकडेही गांभिर्याने पाहिले जाणे अपेक्षीत असते. राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळला मंजुर झाली. तेथे इमारत नसल्यामुळे ती सध्या नंदुरबारात सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्यालयी सुरू असतांनाही शाळेत अनेक असुविधा आहेत. गेल्यावर्षी अनेक बाबतीत ही शाळा गाजली होती. शिक्षकांचा पुरेसा स्टॉफ भरण्यात आलेला नाही. प्रतियुक्तीवरील शिक्षक तेथे कार्यरत आहे. पुरेसे शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घोषीत केलेल्या मॉडेल कॉलेजला केवळ जमीन उपलब्ध झाली आहे. पुढे काहीही प्रक्रिया नाही. एकलव्य इंग्रजी पब्लिक स्कूलचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. तंत्रनिकेतन महाविद्यालयातही अपु:या सुविधा, शिक्षकांची कमतरता या समस्या आहेतच. कृषी महाविद्यालयात पुरेसा स्टाफ, प्रयोगशाळा व इतर सुविधांची अद्यापही प्रतिक्षा आहे. वैद्यकीय महाविद्यालय मृगजळ ठरू पहात आहे. एकुणच घोषणा आणि त्यानंतरची अंमलबजावणी पहाता नंदुरबार केवळ शासकीय योजना, उपक्रमांसाठी प्रयोगाचे केंद्र ठरू नये एवढीच अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.