शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सत्तेच्या लिलावाला शासनाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सत्ता आणि पैशांची चर्चा सर्वश्रुत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता याबाबत सूर सातत्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सत्ता आणि पैशांची चर्चा सर्वश्रुत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता याबाबत सूर सातत्याने समाजात व्यक्त होताना दिसतो; पण काही सूर कायद्याच्या चौकटीत अडकतात, तर काही सूर हवेतच विरतात. खोंडामळी, ता. नंदुरबार येथील ग्रामपंचायतीच्या लिलावाचा सूर कायद्याच्या चौकटीत अडकला आणि निवडणूक आयोगाने तेथील निवडणूक स्थगित करून आता पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे जाहीरपणे गावात सत्तेचा लिलाव करणाऱ्यांना चपराक बसला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या खरोखरच खूप संवेदनशील असतात. कारण गल्लीबोळांत आणि शेजारी राहणारेच परस्पर निवडणुकीच्या स्पर्धेत असल्याने विरोधाचा सूर अधिक आक्रमक असतो. त्याचे पडसाद कितीतरी काळ पुढे उमटत असतात; पण काही गावांत एकीचा सूरही उमटत असतो. सामूहिक बैठकीतून निर्णय घेण्याची परंपरा फार जुनी आहे. ही परंपरा आजही अनेक गावांत टिकून आहे. अर्थात, काही गावांत वस्तीपुरती एकी असते, तर काही गावांत काही ठरावीक भागातील रहिवाशांमध्येच एकीचा सूर असतो. त्यामुळे जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा त्याचे पडसाद प्रत्येक गावातील वातावरणाप्रमाणे उमटत असतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येदेखील असे पडसाद जिल्ह्यात पाहायला मिळाले. कंढ्रे, ता. नंदुरबार हे गाव तसे भाऊबंदकीचे. मात्र, असे असले तरी गावात निवडणुकीच्या काळात खूप चुरस पाहायला मिळाली. अशा प्रकारची चुरस अनेक गावांत होती, तर जवळपास २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  या सर्वांमध्ये निवडणूक न लागताच राज्यभर गाजले ते खोंडामळी या गावाचे नाव. या गावात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच गावातील लोकांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने जाहीरपणे लिलाव आयोजित केला होता. अर्थात, या लिलावातील बोलीही गावातील मंदिराच्या बांधकामासाठी होती; पण त्याचा संबंध जो जास्त मदत करेल त्याच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने कारवाई सुरू झाली. शेवटी मतदानाच्या दोन दिवस अगोदर या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्याने घेण्याचा आदेश काढण्यात आला.अर्थात, ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी ग्रामस्थांनी बोली लावण्याचे हे पहिले उदाहरण नाही. यापूर्वीदेखील अशा घटना घडत होत्या; पण त्यासंदर्भात तक्रारी न झाल्याने त्यावेळी कदाचित कारवाई होऊ शकली नसेल; पण खोंडामळी आणि उमराण या गावांसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशातून काही शिकता येईल का? याचा विचार निश्चितच आता गावातील लोकांनी केला पाहिजे. ज्या गावातील निवडणुकांना स्थगिती देऊन पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या गावात कदाचित पुन्हा बिनविरोध निवडणूक होऊ शकेल. कारण निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करणे हा शासनाचा निर्णय आहे; पण ग्रामस्थांचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. तो निर्णय बदलण्याचा अथवा कायम ठेवण्याचा अधिकार हा तेथील ग्रामस्थांनाच आहे. त्यामुळे त्यात कुणी हस्तक्षेपही करू शकत नाही. मात्र, आपल्या अधिकाराचा असे जाहीरपणे बोली लावून त्याचे अवमूल्यन करायचे की, मूल्य वाढवायचे हा निर्णय आता ग्रामस्थांनीच घेण्याची आवश्यकता आहे.